नांदेड : नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात असलेल्या मौजे रुई येथे मुस्लीम समाजातील सामान्य कुटुंबात झालेल्या शेतजमिनीच्या वादात समाधानकारक तोडगा निघाला नाही. मात्र यावरुन जो वाद झाला त्या वादातातून दोन सख्ख्या भावांनी परवेझ पंटूस देशमुख या आपल्या २१ वर्षीय चुलत भावाच्या छातीवर धारदार विळ्याने वार करून त्याची हत्या केली आहे. थरकाप उडविणार्या या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सध्या सुरु आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे. यासंदर्भात माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.