मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फडणवीसांचीच भाषा बोलतात,मनोज जरांगे म्हणाले सरकारचा करेक्ट कार्यक्रम …….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | GOVERNMENT OF MAHARASHTRA | CHIEF MINISTER EKNATH SHINDE | DEPUTY CHIEF MINISTER DEVENDRA FADNAVIS | DEPUTY CHIEF MINISTER AJIT PAWAR | MARATHA PROTESTER MANOJ JARANGE PATIL | MARATHA RESERVATION | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा फडणवीसांचीच भाषा बोलतात.
सरकारने मराठा आरक्षण आंदोलकांवर खोटे आरोप करून आंदोलनकर्त्यांवर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मराठा समाजात नाराजीची मोठी लाट वाढत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा उपमुख्यमंत्री फडणवीसांचीच भाषा बोलू लागले आहेत. असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे. आता मीच सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो असेही त्यांनी विधान केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या संदर्भात कोणीही मर्यादा सोडल्यास त्याचा करेक्ट कार्यक्रम करू असे भाष्य केले होते. त्यावर बोलताना जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा कडक शब्दांत समाचार घेतला आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
भित्तीपत्र काढून टाकण्याची हिंमत कोणाचीही होणार नाही !
जरांगे यांनी सोलापूर जिल्ह्यात करमाळा, मोहोळ, बार्शी इत्यादी भागात दौरे करून सभा घेतल्या आहेत. सर्व सभांना उत्तम प्रतिसाद मिळाला होता. मराठा आरक्षण आंदोलन दाबून टाकण्यासाठी पोलीस आता आंदोलनाचे उभारलेले फलक काढत आहेत. यात पोलिसांना दोष देता येणार नाही कारण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याच सांगण्यावरून मराठा आंदोलनाचे फलक काढले जात आहेत. फडणवीस यांच्या पोटात मराठा समाजाच्या आंदोलनामुळे दुखू लागले आहे असाही आरोप जरांगे यांनी केला आहे.आज सार्वजनिक जागेवरील फलक काढले जातील. पण आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर प्रत्येक मराठा व्यक्तीने आपापल्या घराच्या दरवाजावर कोणत्याही पुढाऱ्याने मते मागण्यासाठी आमच्या घरात येऊ नये, असे भित्तीपत्र लावावेत. असेही आवाहन त्यांनी केले. घरावर लावलेले भित्तीपत्र काढून टाकण्याची हिंमत कोणाचीही होणार नाही असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
स्त्रोत. सोशल मिडिया.
सरकारचाच करेक्ट कार्यक्रम करू ….
मराठा आरक्षण ओबीसीतून मिळण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून आपण सहा महिने वाट पाहिली. मराठा आरक्षण ओबीसीतून देण्याऐवजी दहा टक्के स्वतंत्र आरक्षणाच्या अधिसूचनेचा मसुदा प्रसिद्ध केला. त्यात सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी नाही. उलट करेक्ट कार्यक्रम करण्याची धमकी देण्याची भाषा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे जी भाषा बोलत आहेत ती भाषा फडणवीसांची आहे अशी टीका जरांगे यांनी केली आहे. मात्र मराठा समाजही आता प्रचंड नाराजीच्या लाटेत आहे. सरकारचाच ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे.