नागपूर : ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर व मन सुन्न करणारी घटना घडली ती शाळा भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे. या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब आहे. असा आरोप काँग्रेसने केला आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी देखील ट्विट करून बदलापूर घटनेचा निषेध केला आहे. महाविकास आघाडीने २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र उच्च न्यायालयाने राजकीय पक्षचा बंद बेकायदेशीर ठरवल्याने बंदचे रुपांतर मूक आंदोलनात करण्यात आले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन व्हरायटी चौकात तर काँग्रेसचे आंदोलन संविधान चौकात सुरू केले आहे.

Deputy CM And Home Minister Devendra Fadnavis On Badlapur School Crime News  | बदलापूरच्या शाळेत चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, गृहमंत्री देवेंद्र  फडणवीस म्हणाले...(संग्रहित दृश्य.)

महिला मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर !

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभाग आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. मात्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहखात्यावर लक्ष नसल्याने कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा महाविकास आघाडीचा आरोप केला आहे. आता प्रदेश युवक काँग्रेसने देखील हाच मुद्दा उचलून धरला आहे. राज्यात महिलावरील अत्याचारात वाढ झाली आहे. राज्यात बाल अत्याचारांच्या घटनाही वाढल्या आहेत. पण, गृहमंत्री निष्क्रिय आहेत, असा आरोप फलक हातात घेऊन काँग्रेसने केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करणारे फलक कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते. तसेच दोषींना शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे.बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेने राज्यातील महिला मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Big decision of Shinde Fadnavis government 20 thousand police posts will be  filled in the state soon msr 87(संग्रहित दृश्य.)

पोलीसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बदलापूरच्या घटनेत पोलीसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तक्रार दाखल करण्यास गेलेल्या पीडित मुलीच्या आईला तासनसात पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले होते. आता पोलीस यंत्रणेसोबतच राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे. काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, आमदार अभिजीत वंजारी, तानाजी वनवे, रेखा बाराहाते, अशोक धवड, प्रफुल्ल गुडधे, गिरीश पांडव, विशाल मुत्तेमवार तसेच अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.