TIMES OF AHMEDNAGAR
पुणे विमानगर परिसरातील एका हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरु होता. या प्रकारची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने विमाननगर येथील वेश्याव्यवसाय सुरु असलेल्या हॉटेलमध्ये घुसून कारवाई केली. या कारवाईत राजस्थानी अभिनेत्रीसह उझबेकिस्तानमधील दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे. या महिलांची दलाली करणारे दलाल परराज्यातील आहेत. हे दलाल ऑनलाइन पद्धतीने वेश्याव्यवसाय चालवित असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
याप्रकरणी रोहित (पूर्ण नाव पत्ता महित नाही) आणि दलाल इरफान उर्फ राहुल मदन उर्फ मदन सन्यासी यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये विमाननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानगर भागातील एका हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. आरोपी इराफान आणि रोहित परराज्यातील आहे. ते ऑनलाइन पद्धतीने वेश्याव्यवसाय चालवित होते.

याबाबतची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीन खातरजमा केली. निको गार्डन रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. हॉटेलमधील दोन खोल्यांमधून उझबेकिस्तान आणि राजस्थान येथील तीन तरुणींना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणींपैकी एक तरुणी राजस्थानी अभिनेत्री असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. दलालांनी कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये रुम आरक्षित करून तरुणींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे उघड झाले आहे.