पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर मंगळवारी (दि.२५) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी १३ पथके तैनात केली होती. या पथकांच्या माध्यमांतून आरोपीचा शोध घेतला जात होता,पण अखेर या आरोपीला गुणाट या गावातून पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ अनेक संघटनाकडून स्वारगेट एसटी बस स्थानकात आंदोलन करण्यात आले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीव पुणे पोलिसांनी १३ ठिकाणी पथक रवाना केली होती.तसेच आरोपीचा तांत्रिकदृष्ट्या विश्लेषणाद्वारे देखील शोधा घेतला जात होता. तर आरोपीने मागील दिवसात ज्या ज्या व्यक्तीना फोन केले होते. त्या सर्व व्यक्तींकडे पोलिसांमार्फत चौकशी केली जात होती. त्याच दरम्यान आरोपी दत्तात्रय गाडे या आरोपीला शोधून देणार्‍या नागरिकाला पुणे पोलिसांनी एक लाख रूपयांचे बक्षीस देखील जाहीर केले होते. तर आरोपी दत्तात्रय गाडे हा मूळचा शिरुर तालुक्यातील गुणाट या गावातील आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोपीच्या गावामध्ये पुणे पोलिसांनी ड्रोन आणि श्वान पथकाच्या माध्यमांतून दिवसभर आरोपीचा शोध घेतला. आरोपी दत्तात्रय गाडे हा गुणाट गावातील एका नातेवाईकाच्या घरी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पाणी पिण्यास आला होता. मला पश्चाताप झाला असून पोलिसांसमोर सरेंडर व्हायच असल्याच सांगून आरोपी हा नातेवाईकांच्या घरापासून निघून गेला.

Entering the house, four youths took them away, took them to a secluded  place and took them hostage, gang-raped and left in a state of disrepair. |  जयपुर में 14 साल की(संग्रहित दृश्य.)

मात्र अनेक अडथळ्यांचा सामना पोलिसांना करावा लागला,अखेर रात्रीच्या सुमारास गुणाट गावातून आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी अटक केली असून लष्कर पोलिस स्टेशन येत आणण्यात आले आहे. या आरोपीची वैद्यकीय तपासणी करून दुपारी १२  वाजण्याच्या सुमारास पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केल जाणार असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे.