TIMES OF AHMEDNAGAR
उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे महाराष्ट्राला परिचित आहेत. अजित पवार कार्यकर्त्यांना देखील दम देऊन मोकळे होतांना आपण व्हायरल व्हिडीओमधून पहात असतो. अजित पवार सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवार यांनी थेट या मोदीला हटवाचा नारा देताच एकच हशा पिकला.
महाराष्ट्रात २०१९ साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकींच्या नंतर सत्तेसाठी नेत्यांमध्ये असलेली सत्तेच लालच महाराष्ट्राने पहिली. निवडणुकांनंतर राजकीय महानाट्याचे दिखील महाराष्ट्राला दर्शन झाल.आधी सेना-भाजपाचं बिनसलं. नंतर अजित पवारांनी फडणवीसांसोबत शपथ घेतली. चारच दिवसात ते सरकार गडगडलं आणि महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. २०२२ साली ठाकरे गटात मोठी फूट पडली आणि सरकार कोसळलं. २०२३ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तशीच फूट पडली आणि अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाला. या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रातला सत्तानाट्याचा अंक अद्याप संपला नसल्याचंच सातत्याने समोर येत आहे. आता अजित पवार गट भाजपाबरोबर सत्तेत असताना त्यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते मोदींना हटवण्याची भाषा करत आहेत.
काय म्हणाले अजित पवार.
सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अजित पवार म्हणतात तुम्हाला तुम्हाला उद्या मकर संक्रांतीच्यापण मनापासून हार्दिक सुभेच्छा देतो.तीळगुळ घ्या गोडगोड बोला,परंतु या मोदीला हटवा असे आवाहन उपस्थितांना अजित पवार करत असल्याचा व्हीडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
तिळगुळ घ्या गोडगोड बोला परंतु या मोदीला हटवा = अजित पवार.
मस्त शुभेच्छा दिल्या 🙏🏻🙏🏻🙏🏻pic.twitter.com/ZKM9mS7mdv
— Adv Anand Dasa (@Anand_Dasa88) January 14, 2024
नेटकाऱ्यांनी केली टीका
हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे याविषयी अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, २०१९ च्या निवडणुकांदरम्यानचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवार या व्हिडीओमध्ये एका सभेमध्ये भाषण करताना दिसतात. विशेष म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडीओ असल्याचं त्यातल्या शब्दांवरून समजतंय. हा व्हिडीओ व्हायरल होत असताना नेटिझन्सनी जोरदार ट्रोलिंग सुरू केलं आहे.
२०१९ च्या निवडणुकीत मोदींविरोधी भाषणं करणारे अजित पवार आता राज्यात भाजप व शिंदे गटासह सत्तेत असल्यामुळे हा राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. काही नेटकाऱ्यांनी “काय होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू”, असा टोला लगावला आहे.