औरंगजेब बलाढ्य होता महाराज पाच फुटांचे होते.

दरम्यान विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आक्रमक भूमिका मांडली आहे.जो छत्रपती शिवाजी महाराजांचा व छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल त्याला सोडलं जाणार नाही. असं फडणवीसांनी म्हंटल आहे. महाराजांचा अवमान करणाऱ्यांना आम्ही १०० टक्के जेलमध्ये टाकू. या कोरटकरनं कोल्हापूरच्या कोर्टातून अटकेवर स्थगिती घेतली आहे. त्यावर मी वरच्या कोर्टात जायला सांगितलं आहे. पण हे कोरटकर तर चिल्लर लोक आहेत. मला सांगा जितेंद्र आव्हाड  काय बोलले ? त्याचा कधी निषेध केला नाही तुम्ही. जितेंद्र आव्हाड म्हणतात औरंगजेब होता म्हणून शिवाजी महाराज होते, औरंगजेब बलाढ्य होता महाराज पाच फुटांचे होते हे रेकॉर्डवर आहे. त्याचा निषेध का केला जात नाही. असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना केलाय.

Maharashtra Lok Sabha Elections CM Devendra Fadnavis Says Positive Discussions in Delhi on Seat Sharing | Lok Sabha Elections: महाराष्ट्र में NDA के बीच सीट बंटवारे पर बन गई सहमति? जानें डिप्टी(संग्रहित दृश्य.)

आहे का हिंमत ?

यावेळी देवेंद्र फडणवीसांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचाही उल्लेख केला. पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिले त्याचा निषेध तुम्ही करणार आहात का ? आहे का हिंमत ? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही. त्यामुळे पंडित नेहरूंचाही धिक्कार झाला पाहिजे. छत्रपतींच्या विरुद्ध सगळ्यात जास्त पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलं आहे. असं देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेत म्हणाले.