पारनेर लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सुजय विखे यांचा पराभव करून निलेश लंके हे खासदार झाले. आता विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून अजित पवार हे आज निलेश लंके यांच्या होम ग्राउंडवर दाखल झाले. पारनेर येथील बाजार तळ येथे कार्यकर्ता मेळावा आणि पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी चांगलेच खडसावले. निलेश लंके यांनी तुम्हाला पाठवले आहे का ? असे अजित पवारांनी म्हटले.
(संग्रहित दृश्य.)
कुणाच्या नावाने घोषणा दिल्या तर त्याला तिकीट मिळणार नाही.
कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार म्हणाले की महायुती म्हणून २८८ उमेदवार उभे करणार आहोत. समोरचे त्यांचा त्यांचा भाग म्हणून काम करतील. वसंत झावरे , निलेश लंके, विजय औटी यांनी या पूर्वी या तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने काम करत आहे. कुणाच्या नावाने घोषणा दिल्या तर त्याला तिकीट मिळणार नाही. असे म्हणत भाषणाच्या सुरुवातीलाच अजित पवार यांनी घोषणा देणाऱ्यांना खडसावले. अजित पवारांच्या भाषणा दरम्यान पारनेर तालुक्यातील दुष्काळी भागाला पाणी द्या असं म्हणत बॅनर झळकवण्यात आले. भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संतोष वाडेकर आणि कार्यकर्त्यांनी हे बॅनर झळकवले. यानंतर घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी चांगलेच खडसावले. निलेश लंके यांनी तुम्हाला पाठवले आहे का ? असा सवाल देखील अजित पवार यांनी उपस्थित केला.
(संग्रहित दृश्य.)
पुरुषांच्या बरोबरीने महिलांना संधी दिली नाही तर तो देश मागे पडतो.
दरम्यान डी झोन मध्ये महिलांना बसण्यासाठी स्वतः अजित पवारांनी जागा करण्यासाठी पोलिसांना सूचना दिली. तर सभास्थळी आणलेल्या वेगवेगळ्या स्थानिक नेत्यांचे फोटो अजित पवारांनी खाली घ्यायला सांगितले. अजित पवार यांनी विरोधकांवर हल्लाबोल देखील केला. पुरुषांच्या बरोबरीने महिलांना संधी दिली नाही तर तो देश मागे पडतो. त्यामुळे अर्थसंकल्प सादर करताना मी महिलांचा विचार केला. म्हणून आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणायचं ठरवलं. विरोधकांनी त्यावरही टीका केली, विरोधक वाटेल ते बोलले. असे म्हणत अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तर पारनेर तालुका दुष्काळी भाग आहे. पण सुप्यात एमआयडीसी आली,बदल झाला, पण, पारनेरच्या सुपा एमआयडीसीत गुंडगिरी आहे. असा आरोप अजित पवार यांनी केला आहे.