तुळजापूर ड्रग प्रकरणात १३ पुजाऱ्यांचा संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर आता या पुजाऱ्यांचे राजकीय कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणात सर्वच पक्षांचे मिलीभगत असल्याचं दिसून येत आहे . या प्रकरणातील राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे हे दोघे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचा समोर आलं आहे. ड्रग प्रकरणातील या आरोपींचे खासदार ओमराजे निंबाळकरांसोबत फोटो व्हायरल झाल्याने काही दिवसांपूर्वी मोठी खळबळ उडाली होती. तर विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे चंद्रकांत उर्फ बाबू कने,विनोद गंगणे, तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष हे भाजपशी संबंधित आहेत. तुळजापूर प्रकरणात आत्तापर्यंत एकूण ३५ आरोपी आहेत त्यातले १३ आरोपी पुजारी असल्याचं सूत्रांचे म्हणणे आहे. पण या पुजाऱ्यांचा रोजच्या पुजाऱ्यांशी संबंध नाही असे पुजारीची भूमिका आहे. काही दिवसांपूर्वीच तुळजापूर ड्रग प्रकरणात आरोपींसोबत फोटो व्हायरल झाल्या प्रकरणे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यात आरोपींवरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते .काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यावर तुळजापूर प्रकरणातील आरोपींचे फोटो दाखवत हे आरोपी राणा पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचा दावा केला होता .तर खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आरोपींसोबत फोटो ही व्हायरल झाले होते .या प्रकरणात सर्वच पक्षांचे आरोपी असल्याचे उघड होत आहे. त्यामुळे तुळजापूर ट्रक प्रकरणाशी जोडला गेलेला राजकीय वरदहस्त हाही गंभीर प्रश्न समोर आला आहे. तुळजापूर ड्रग प्रकरणात आरोपी चंद्रकांत कने याने विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार केला होता. तर ट्रक प्रकरणातील आरोपी विनोद गंगणे हे भाजपशी संबंधित आहेत. यावर खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले या प्रकरणाचा सगळ्यात पहिल्यापासून मी पाठपुरावा करत आहे. केवळ लोकप्रतिनिधी म्हणून हा पाठपुरावा करत नाही इथला जबाबदार नागरिक म्हणून करत आहे. आपल्या जिल्ह्याच्या तरुणांवर या ड्रगचा किती खोलवर परिणाम होतो त्याची मला जाणीव आहे. तरुण पिढी ड्रग्सच्या आहारी जाऊ नये ही माझी मानसिकता आहे. यासंदर्भात मी गृहमंत्री अमित शाह यांनाही पत्र लिहिलं आहे. सेंट्रल नार्कोटिक्सला ही मी पत्रव्यवहार केले आहेत .संसदेत मी हा विषय उचलला आहे .स्थानिक एसपींची मी संपर्कात आहे .
(संग्रहित दृश्य.)
ओमराजे निंबाळकर काय म्हणाले.
या प्रकरणात आमचा सख्खा भाऊ जरी असला किंवा कोणी जरी असेल तर त्याच्यावरही कारवाई होणारच असे ओमराजे निंबाळकर म्हणाले. व्हायरल फोटोविषयी बोलताना ते म्हणाले मी कायम लोकांच्या संपर्कात असतो. जर कोणी माझ्यासोबत फोटो काढायला आला तर मला तुम्ही कोण आहात हे विचारणं शक्य नसतं असंही ते म्हणाले. यात भाजपशीही संबंधित कोणी असेल तरी मी त्याला पक्षाशी जोडत नाही. संबंधित आरोपीला आरोपीसारखं वागवून त्याच्यावर कारवाई करा अशी मागणी असल्याचं निंबाळकर म्हणाले. दरम्यान सरसकट पुजाऱ्यांना बदनाम करू नका याचा रोजच्या पुजाऱ्यांशी संबंध नसल्याचं पुजारी मंडळाचे विनित शिंदे यांचं म्हणणं आहेत. तूळजापुरात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या ड्रग्ज प्रकरणात मुंबईतील महिला संगीता गोळेकडून ड्रग्ज पुरवठा होत असल्याचे समोर आल्यानंतर तुळजापुरातील काही आरोपी या रॅकेटमध्ये सामिल असल्याचे समोर आले. मुंबईतून सोलापूर मार्गे तुळजापुरात ड्रग्ज सप्लाय झाल्याचे समोर आल्यानंतर तामलवाडी टोल नाक्यावर पहिल्यांदा ड्रग्ज कारवाई करण्यात आली. तुळजापुरात गेल्या तीन वर्षांपासून ड्रग्ज तस्करी होत असल्याचा पुजाऱ्यांचा आरोप होता. यात आतापर्यंत ३५ जण आरोपी असून तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या ३ आरोपीना ४५ ग्रॅम ड्रग्ज असलेल्या ५९ पुड्या ड्रग्जसह (दि. १४)फेब्रुवारीला तामलवाडी येथे रंगेहात अटक करण्यात आली.त्यानंतर या ३ आरोपीना ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई महिला तस्कर संगीता गोळेला (दि.२२) फेब्रुवारी,संतोष खोतला (दि.२७) फेब्रुवारी,तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला (दि. २८) फेब्रुवारीला अटक करण्यात आली. सोलापूरहुन ड्रग्ज खरेदी करणारे सयाजी चव्हाण, ऋतूराज गाडे व संकेत शिंदे या ३ जणांना १६ ग्रॅम ड्रग्ज असलेल्या ३० पुड्या ड्रग्जसह (दि. ४) मार्च रोजी अटक करण्यात आली.पुणे येथील सुल्तान उर्फ टिपू शेख व सोलापूर येथील जीवन साळुंके या दोघांना (दि.२३) मार्चला, राहुल कदम व परमेश्वर याला (दि.२४) मार्चला अटक केली त्या दिवशी ४गोपनीय व नवीन ६ अशी १० जणांची नावे उघड केली. गजानन हंगरकर याला (दि.२५ ) मार्चला अटक केली त्यानंतर पोलिसांनी कोर्टात (दि.२६ )मार्चला नवीन १० आरोपींची नावे जाहीर के