तर फोटो आणि व्हिडिओ जाहीर करा,' खडसेंच्या दाव्याला महाजनांनी दिलं उत्तर(संग्रहित दृश्य.)

एकनाथ खडसेंना गिरीश महाजनांचे आव्हान…

मी जर एक गोष्ट सांगितली तर एकनाथ खडसे घराबाहेर पडल्यावर लोक त्यांना जोड्याने मारतील. माझं त्यांना आव्हान आहे त्यांनी एक पुरावा दाखवावा मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेन. मी कधीही कुणालाही तोंड दाखवणार नाही. तसंच जे काही आहे ते लोकांना दाखव, फालतू बडबड करु नको अशा पद्धतीने त्यांनी एकनाथ खडसेंचा एकेरी उल्लेखही केला. मी यांना दिलं मोबाइलमधे होते मोबाइल हरवला लाज वाटते का खोटं बोलताना. माझा अंत बघू नका. मी जर एका गोष्टींचा खुलासा केला तर खडसेंना तोंड काळं करुनच बाहेर पडावं लागेल. घरातलीच गोष्ट आहे पण मी बोलणार नाही. एका भोंदू पत्रकाराला सांगून हा विषय उचलायला लावला आहे. त्यातून हा विषय झाला आहे.असं उत्तर आता गिरीश महाजन यांनी दिलं आहे.