ठाकरे गटातील माजी मंत्र्यांचा शिंदे गटात प्रवेश, लोकसभेची निवडणूक संपताच ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MUMBAI | SHIV SENA (THACKERAY GROUP) | SHIV SENA (SHINDE GROUP) | CHIEF MINISTER EKNATH SHINDE | FORMER MLA JAIPRAKASH MUNDADA | FORMER MLA JAIPRAKASH MUNDADA HAS PUBLICLY JOINED THE SHIV SENA SHINDE FACTION | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
लोकसभेची निवडणूक संपताच शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी शुक्रवारी (ता. १४) हा प्रवेश सोहळा पार पडला होता. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुंदडा यांचे स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
स्त्रोत सोशल मिडिया
मुंदडा यांचा शिंदे गटात प्रवेश….
जयप्रकाश मुंदडा हे हिंगोली विधानसभा मतदारसंघातून सलग ४ वेळा निवडून आले होते. ते माजी सहकार राज्यमंत्री देखील होते. त्यांची हिंगोलीत मोठी ताकद आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून जयप्रकाश मुंदडा हे नाराज होते. आपल्याला पक्षात डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीतही पक्षातील कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी माझे ऐकून न घेतल्याचे जयप्रकाश मुंडदा यांनी सांगितले आहे. इतकेच नाही तर शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) यांनी देखील आपल्याला विश्वासात घेतलेले नाही. परस्पर उमेदवार जाहीर केला आहे अशी नाराजी जयप्रकाश मुंदडा यांनी व्यक्त केली आहे.