नशेच्या मोहापायी एका अल्पवयीन मुलाने केला अल्पवयीन मित्राचा निर्घुण खून, “नशा करू नको” हे सांगणे बेतले जीवावर….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | THANE | MUMBRA DEVI | CRIME NEWS | THE FRIEND DID THE KILLING BECAUSE HE SAID NOT TO DESTROY | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
नशा करू नकोस असे सांगणाऱ्या मित्राचा राग आल्याने त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंब्रा येथे उघड झाला आहे. त्यामुळे नशेच्या मोहापायी तरुण मुले खून करण्यासही मागेपुढे पाहत नसल्याचे समोर आले आहे. हत्या करण्यात आलेल्या मेहताब याचा मृतदेह ९ जून रोजी मुंब्रा आंबेडकर डोंगरावर सापडला होता. त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. रेहान बाग येथे राहणाऱ्या मेहताब मंसुरी (वय १५) हा ६ जूनपासून बेपत्ता असल्याने त्याच्या आई-वडिलांनी या संदर्भात मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर ९ जून रोजी मुंब्रा बायपास रोडवर असणाऱ्या आंबेडकर डोंगरावर मेहताब याचा मृतदेह पोलिसांना सापडला होता.
स्त्रोत सोशल मिडिया
रागामध्ये मित्राच्याच डोक्यात दगड घालून हत्त्या…
पोलिसांनी यासंदर्भात तपास केला असता मेहता मन्सुरी याची मुंब्रा देवी पद येथे राहणाऱ्या २३ वर्षांच्या फैज सुलतान मलिक याच्याशी ओळख असल्याचे समोर आले आहे. त्या दिशेने तपास करत असताना मेहताब हा खेळायला जात असताना बाजारपेठेत फैज याला भेटल्याचे समोर आले होते. त्या दिवशी फैज सुलतान हा आंबेडकर डोंगरावर नशा करण्यासाठी जात होता. याचवेळी मेहताब मंसूरी त्याला भेटला यावेळी मेहताबने देखील आपल्याबरोबर नशा करण्यासाठी यावे अशी फैजची इच्छा होती. त्यासाठी त्याने मेहताबच्या मागे तगादा लावला होता. त्यानंतर मेहताब याला इच्छा नसतानाही त्याला फैज बरोबर जबरदस्तीने जावे लागले होते. यावेळी फैजने त्या ठिकाणी नशा करण्यास सुरुवात केली होती. मात्र यावेळी मेहताब याने नशा करू नको असे फैज याला वारंवार सांगितले होते. यावरून दोघांमध्ये भांडण झाले आणि त्याच रागात मेहताब याने फैजला नशा करत असल्याचे घरच्यांना सांगेन अशी धमकी दिली होती. यावेळी मात्र फैजला राग आला आणि याच रागामध्ये फैजने मेहताब याच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्याचा खून केला आहे. यासंदर्भात पोलिसांच्या हाती मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार फैज सुलतान याला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास मुंब्रा पोलिस करत आहे.