राज्यात काल पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर महाराष्ट्रातील अनेक एक्झिट पोल समोर आले आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, महायुती आणि महाविकास आघाडीत मोठी चूरस पाहायला मिळत आहे. विविध संस्थांचे वेगवेगळी आकडेवारी समोर आली आहे. या अंदाजानुसार, राज्यात महायुती सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होईल, असा जनमताचा कौल दिसून येत आहे. राज्यातील २८८ जागांपैकी महायुतीला १४६ जागा मिळत आहेत, जे बहुमताच्या संख्येपेक्षा फक्त एक जागा जास्त आहे. तर महाविकास आघाडीला १३० जागा मिळण्याची अपेक्षा आहे. इतरांना १२ जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे. मात्र, शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एक्झिट पोल हा फ्रॉड आहे, म्हणत महाविकास आघाडीच्या विजयाच्या आणि सत्ता स्थापनेचा विश्वास व्यक्त केला आहे.
(संग्रहित दृश्य.)
सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात येतील की फक्त…
संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना ते म्हणाले, एक्झिट पोल फ्रॉड आहे. हरियाणामध्ये काँग्रेस ६० च्या वर जागा येईल असा पोल होता, पण काय झालं ते आपण पाहिलं. लोकसभेला ४०० पारचे पोल होते, पण काय झाले आपण पाहिलं आहे. लोकांनी मतदान केले आहे, ते गुप्त असते, ते माहिती असताना, काही लोक गोंधळ वाढवत आहे. महाविकास आघाडी २६ तारखेला सत्ता स्थापन करेल. २३ तारखेला निकाल लागतील, मविआला १६० पेक्षा आधीक जागा येण्याची शक्यता आहे. आम्ही २३ तारखेला ही सत्तेवर दावा करू शकतो. महाविकास आघाडीला १६०-१६५ जागा मिळू शकतात. त्यामुळे या पोलवर कोणीही विश्वास ठेवू नये, आत्तापर्यंत कोणते पोल खरे ठरले, तो संशोधनाचा विषय असल्याचा राऊत यांनी म्हटलं आहे. सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात येतील की फक्त कुलूप हाती येतं, ते येत्या ७२ तासांमध्ये ठरेल. मोठ्या प्रमाणावर पैशांचा पाऊस पाडला, मात्र आम्हाला खात्री आहे, जनतेने पैशाच्या प्रवादान वाहून न जाता मतदान केलं असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी १६०-१६५ जागा मिळू शकतात. आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो, त्यामुळे या पोलवर कोणीही विश्वास ठेवू नये, महायुतीतील पक्षांनी पोल केले आहेत, आत्तापर्यंत कोणते पोल खरे ठरले, तो देखील संशोधनाचा विषय आहे, म्हणत संजय राऊत यांनी राज्यात सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे. २३ तारखेला साडे दहा ते अकरा वाजता मी तुम्हाला सांगेन महाविकास आघाडीचा कोणता मुख्यमंत्री असेन असंही यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, काँग्रेस यांना स्पष्ट बहुमत मिळेल. आम्हाला महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेइतकं बहुमत मिळेल असंही ते यावेळी म्हणाले. प्रचंड बहुमत नसल्यामुळे सरकारमध्ये फूट पडण्याची भीती आहे. जागा कमी झाल्या तरी अजित पवारांचा पक्ष महत्वाच्या स्थितीत असेल. अजित पवार यांच्या २२+ जागांशिवाय सरकार स्थिर राहू शकत नाही. पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरेंपेक्षा शरद पवार यांच्याबद्दल जास्त सहानुभूती आहे. एकनाथ शिंदे यांच्यासमोर उद्धव ठाकरेंचा खरा शिवसेनेचा दावा फेटाळला जात आहे.