माजी नगरसेवक वनराज आंदेकरांची झुंज संपली ; उपचारांदरम्यान मृत्यू
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | PUNE | PUNE CRIME NEWS | PUNE POLICE | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री नाना पेठेत घडली.उपचारासाठी आंदेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,मात्र रात्री उशिरा खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
(संग्रहित दृश्य.)
शहराच्या मध्य भागात घबराट उडाली.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी तीन ते चार संशयितांची नावे पोलिसांना समजली असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर माजी नगरसेवकावर गोळीबार करण्यात आल्याने शहराच्या मध्य भागात घबराट उडाली आहे. वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्या वेळी त्यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. तसेच कोयत्याने वार केले. या हल्ल्यात आंदेकर जखमी झाले, गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली आहे.
(संग्रहित दृश्य.)
वर्चस्वाच्या वादातून गोळीबार ?
गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नाना पेठ परिसरात आंदेकर टोळीचा दबदबा आहे. त्यामुळे वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात घबराट उडाली. वनराज यांच्यावर निकटवर्तीयाने गोळीबार केला असून कौटुंबिक वाद तसेच वर्चस्वाच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.