टाकळी येथे होणार लोहार समाजाचा भव्य राज्यस्तरीय मेळावा, आर्थिक विकास भिमाजी लोहार महामंडळराज्यस्तरीय वधू-वर सूचक मेळाव्याचेही आयोजन.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | VIJAY SINGH MOHITE PATIL | PROF. HARSHAL AGLE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
लोहार समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या लोहार समाज आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी टाकळी (ता.माढा जि.सोलापूर) येथे शनिवार दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा लोहार समाजाच्या भव्य राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन व तसेच राज्यस्तरीय वधुवर सुचक मेळाव्याचे हे आयोजन करण्यात आल्याची माहिती अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा लोहार समाज संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब कळसाईत यांनी दिली आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. याबरोबरच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी पालकमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, आमदार बबनदादा शिंदे, माजी कृषिमंत्री आमदार सदाभाऊ खोत, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार नारायण पाटील, माळशिरसचे माजी उपसभापती उत्तम जानकर, विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील, अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, माढा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मिनलताई साठे, उद्योगपती सुरज देशमुख, महाराष्ट्र राज्य ऊसदर नियंत्रण समितीचे सदस्य सुहास पाटील, पं.स.सदस्य धनराज शिंदे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के-पाटील, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजयभैय्या सोनवणे, माजु जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील, डीवायएसपी किरण पोपळघट, युवक नेते रावसाहेब देशमुख, युवक नेते केम अजित तळेकर, उद्योगपती बाळासाहेब ढेकणे, कुर्डूवाडीचे गटविकास अधिकारी महेश सुळे, टेंभुर्णी पोलीस निरीक्षक दीपक पाटील, अशोक कळसाईत, अमोल म्हस्के इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात लोहार समाजातील विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच विविध पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात येणार आहे. लोहार समाजभूषण पुरस्कार व लोहार समाजरत्न पुरस्कार या पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात येणार आहे. लोहार समाजातील विविध संघटनांचे प्रमुख तसेच पदाधिकारी महानगरपालिका नगरपालिकांचे नगरसेवक, नगराध्यक्ष, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहणार आहेत. गणेशतारा मंगल कार्यालय बुधबळवस्ती टाकळी तालुका माढा येथे या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याचे माहिती संयोजकाच्या वतीने देण्यात आले आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील व तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील लोहार समाज बांधवांनी या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन प्रा.हर्षल आगळे, संयोजक सेवाभावी संस्था प्रकोस्ट-सेल भाजप अहमदनगर जिल्हा यांनी केले आहे.