TIMES OF AHMEDNAGAR
गुंड शरद मोहोळच्या हत्येनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी बोलत असताना राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रतिक्रिया दिली.
कोथरुडमधील गुंड शरद मोहोळ याच्या सहकाऱ्याने त्याच्यावर गोळीबार करून त्याची हत्या केली आहे. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले या घटनेमुळे राज्यात कुठेही टोळीयुद्ध होणार नाही. तसेच कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होणार नाही. सदर कुख्यात गुंडाची हत्या त्याच्याच साथीदारांनी केली आहे. गुंड कुणीही असो, त्याचा बंदोबस्तच शासनाद्वारे केला जातो. त्यामुळे असे टोळीयुद्ध करण्याचा कुणीही प्रयत्न करणार नाही. पुण्यात माध्यमांशी संवाद साधत असताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
कोण होता शरद मोहोळ ?
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कातिल सिद्दीकीचा येरवड्यातील अतिसुरक्षित अंडासेलमध्ये कतिलचा मोहोळ आणि साथीदारांनी पायजम्याच्या नाडीने गळा आवाळून खून केला होता.
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कातिल सिद्दीकीचा येरवड्यातील अतिसुरक्षित अंडासेलमध्ये कतिलचा मोहोळ व त्याच्या साथीदारांनी पायजम्याच्या नाडीने गळा आवाळून खून केला. कातिलच्या खुनानंतर देशभर शरद मोहोळ चर्चेत आला. गुंड संदीप मोहोळ याचा शरद मोहोळ विश्वासू साथीदार होता. संदीपचा ४ ऑक्टोबर २००६ रोजी पौड फाटा चौकात भरदिवसा गोळ्या झाडून प्रतिस्पर्धी टोळीने खून केला होता. त्यानंतर शरद मोहोळ आणि साथीदारांनी निलायम चित्रपटगृह परिसरातील एका उपहारागृहात प्रतिस्पर्धी गणेश मारणे टोळीतील किशोर उर्फ पिंटू मारणे याच्यावर गोळीबार करुन खून केला होता. याप्रकरणात मोहोळ आणि त्याचा साथीदार अलोक भालेराव यांना अटक करण्यात आली होती. अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या येरवड्यातील अंडा सेलमध्ये माेहोळ आणि भालेराव यांनी कतिलचा खून केल्यानंतर तो देशभर चर्चेत आला होता. सिद्धीक खून प्रकरणात तपास यंत्रणांकडून मोहोळची याप्रकरणात चौकशी करण्यात आली होती. २६ जून २०१६ रोजी न्यायालयाने कतिल सिद्धीकी प्रकरणात मोहोळ अणि भालेरावची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर मोहोळ विविध राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ लागला. त्याची पत्नीने भारतीय जनता पक्षाचे काम सुतारदरा परिसरात सुरू केले.कोथरुडमध्ये गुंड शरद मोहोळ याचा पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला.