By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: मंगेशला पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला,त्याने वाद घालण्यास सुरुवात केली, वाद वाढताच ओढणीने पत्नीचा गळा आवळून केला खून.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > क्राईम न्यूज > मंगेशला पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला,त्याने वाद घालण्यास सुरुवात केली, वाद वाढताच ओढणीने पत्नीचा गळा आवळून केला खून.
क्राईम न्यूज

मंगेशला पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला,त्याने वाद घालण्यास सुरुवात केली, वाद वाढताच ओढणीने पत्नीचा गळा आवळून केला खून.

Last updated: 2025/03/29 at 2:30 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR 

सांगली : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा ओढणीने गळा आवळून पतीने खून केल्याचा धक्कादायक प्रकार शिराळा तालुक्यातील मांगले या गावात घडला आहे. या प्रकारानंतर पतीने भावाच्या सांगण्यावरून समक्ष पोलीस ठाण्यात हजर होउन खूनाची कबुली देखील दिली आहे. सहा वर्षाच्या मुलाने ही हकीकत चुलत्याला सांगताच हा प्रकार समोर आला आहे. मांगले वारणानगर रस्त्यावर भाड्याच्या घरात गेल्या १५ वर्षापासून वास्तव्य असलेल्या मंगेश चंद्रकांत कांबळे (वय ३२ रा. मांगले, मूळ राहणार कोकरूड) याने पत्नी प्राजक्ता (वय २७) हिचावर चारित्र्यांचा संशय घेउन ओढणीने गळा आवळून खून केला. यानंतर मृतदेह शेजारच्या खोलीत असलेल्या लोखंडी पत्र्याच्या पेटीत ठेवून त्यावर पांघरूण घातले. संशयित पती मुंबईमध्ये नोकरीस असून काही दिवसापुर्वीच आईकडे आला होता. मांगले येथे त्याची आई व भाऊ राहतात. काल आई परगावी गेली होती. या दरम्यान मंगेश कांबळे आणि पत्नीचे कडाक्याचे भांडण झाले. या दरम्यान त्यांचा सहा वर्षाचा मुलगा शिवम व तीन वर्षाची मुलगी शिवन्या होती. भांडणात पतीने पत्नीचा गळा ओढणीने आवळून खून करून प्रेत पत्र्याच्या पेटीत ठेवले. आणि भावाला फोनवर मी कामासाठी बाहेर जात असल्याचे सांगितले. घटनेनंतर काही वेळाने भाऊ घरी आला असता सहा वर्षाच्या शिवमने मम्मीचे आणि पप्पाचे भांडण होउन मम्मीला खलास केले असल्याचे सांगितले. भावाने फोन केला असता पत्नी रूसून गेल्याचे सांगून तिच्या शोधात आपण जात असल्याचे संशयितांने सांगितले. शिराळ्यातील गोरक्षनाथ मंदिराजवळ भावाने त्याला थांबण्यास सांगून भाऊ तात्काळ त्याठिकाणी जाउन या प्रकरणाचा आपणास त्रास व्हायला नको तू तात्काळ पोलीस ठाण्यात जाउन कबुली दे असे भावाने सांगताच संशयितांने पोलीस ठाण्यात हजर होउन खूनाची कबुली देत मृतदेह पेटीत लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलीसांनी त्याला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

You Might Also Like

लग्नाला तगादा लावणाऱ्या प्रियकराने प्रेयसीला संपवले ; आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला अन्…..

चक्क आरोपींकडूनच उकळली लाच ; एसीबीचीने मोठी कारवाई करत ३ पोलिसांना घेतलं ताब्यात. ! 

पत्नीने माहेरच्यांना बोलावून पतीला चोपलं ; अपहरण करून पतीला बेदम मारहाण करत हात-पाय मोडले.

त्या महिला डॉक्टरांचे AI च्या मदतीने बनवले अश्लिल व्हिडिओ ; गुन्हा दाखल.

खबरदार चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य कराल तर….. चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य करणाऱ्या प्रोफाइल धारकांची माहिती भारत सरकारला, ३५७ जणांवर गुन्हा दाखल.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad1
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात त्या आमदाराने केला हक्कभंग प्रस्ताव दाखल…
Next Article सैफअली खानवर चाकू हल्ला करणारा आरोपी हा बांगलादेशी,नाव बदलून राहत होता मुंबईत ; शरीफुल इस्लाम शहजादचा मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल…
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?