एमपीएससीच्या १८ आणि २५ ऑगस्टच्या परीक्षा पुढे ढकलल्या……
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
नागपूर :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(एमपीएससी) वतीने घेण्यात येणारी समाजकल्याण विभागाची परीक्षा व आयबीपीएस आरआरबीआय परीक्षा आणि राज्यसेवा व आयबीपीएस लिपीक बँक ही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने दोन्ही परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अडचणी वाढल्या आहेत.
आयबीपीएसच्या तारखांची घोषणा जानेवारी २०२४ मध्ये झाली असतानाही एमपीएससीने तारखांचा घोळ केल्याची ओरड होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून ही परीक्षा आधीच दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. त्याच दिवशी बँकिंगमधील आयबीपीएस लिपीक परीक्षा होणार आहे. तर दुसरीकडे १८ ऑगस्ट रोजी एमपीएससीकडून समाजकल्याण विभागाच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही जाहिरात गेल्या वर्षीची असून परीक्षेची तारीख गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. पण त्याच दिवशी आयबीपीएस आरबीआय परीक्षाही नियोजित आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी हे दोन्ही परीक्षांसाठी अर्ज करतात. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने विद्यार्थ्यांना कुठल्याही एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.
(संग्रहित दृश्य.)
परीक्षा पुढे ढकलू नका.
मराठा आरक्षणावरून एमपीएससीने राज्यसेवा पूर्व परीक्षा आधीच दोनदा पुढे ढकलली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. काही राजकीय पुढाकाऱ्यांकडूनही समाज माध्यमांवर तशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे आयबीपीएसमध्ये मोचकेचे परीक्षार्थी असल्याने राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलू नका अशी मागणी एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे परीक्षेसंदर्भात दोन मतप्रवाह आहेत.
आयबीपीएसला यासंदर्भात विचारणा करण्यात आली आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात असून यावर काय तोडगा काढता येतो यावर विचार सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या हीत यालाच प्राधान्य आहे. – डॉ. सुवर्णा खरात, सचिव एमपीएससी.