“सरकारकडून आमच्या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर मी लावलेली सलाईन काढून टाकेन”,मनोज जरांगे यांचा सरकारवर निशाना…..
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MUMBAI | MARATHA RESERVATION | MANOJ JARANGE'S HUNGER STRIKE FOR THE MARATHA COMMUNITY | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
लोकसभा निवडणुकांनंतर आता राज्यातील सर्व पक्षांना विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने चर्चा सुरू झाली असून लोकसभा निवडणूक निकालांचे प्रतिबिंब विधानसभेतही दिसेल, अशी शक्यता विरोधकांकडून वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे निकालांनंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले असून त्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून त्यांच्या मागण्यांवर विचारविनिमय होण्याची शक्यता आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
मराठा समाजाला एकजूट दाखवायची गरज नाही….
मी मराठा समाजासाठी खंबीर आहे. सरकारकडून आमच्या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर मी लावलेली सलाईन काढून टाकेन. मी मरणाला घाबरत नाही. “देशानं मराठ्यांच्या एकजुटीचा धसका घेतलाय” मराठा समाजाला एकजूट दाखवायची गरज नाही. २-४ लाख लोक आंतरवली सराटीकडे येत आहेत. तुम्ही इकडे येऊ नका. शेतीची कामे पूर्ण करा. सगळ्या देशाने आपली एकजूट बघितली आहे. मराठ्यांच्या एकजुटीचा देशाने धसका घेतला आहे.