बाप जर मुलींवर बलात्कार करत असेल तर मुलींनी अशा बापाचा खूनच करावा असं खळबळजनक वक्तव्य अभिनेत्री अलका कुबल यांनी केलं आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपल्या देशातही आखाती देशांप्रमाणे कठोर कायदे असायला हवेत असं आव्हाननही अलका कुबल यांनी केलं आहे. दरम्यान जळगावमध्ये झालेल्या खान्देश करिअर महोत्सवाच्या निमित्तानं अभिनेत्री अलका कुबल जळगावमध्ये उपस्थित होत्या त्यावेळी अनेक सामाजिक आणि कौटुंबिक विषयांना स्पर्श करणारी मुलाखत त्यांनी माध्यमांना दिली. खान्देश करिअर महोत्सवासाठी अभिनेत्री अलका कुबल यांनी हजेरी लावली होती. या महोत्सवासाठी अभिनेत्री अलका कुबल उपस्थित होत्या. त्यावेळी त्या म्हणाल्या की महिलांवर अत्याचार रोखायचं असतील तर आखाती देशांप्रमाणे कठोर कायदे असायला हवे त्यात एखादा बापच जर मुलीवर अत्याचार करत असेल तर मुलींनी अशा बापाचा खूनच करायला हवा अशी उद्विग्न होत संतापजनक प्रतिक्रिया अभिनेत्री अलका कुबल यांनी जळगावमध्ये दिली आहे.
अलका कुबल म्हणाल्या की पालकांनी प्रत्येक मुलाचा कल ओळखणं आवश्यक आहे. फक्त इंजिनिअर, डॉक्टर किंवा वकील बनणं हेच ध्येय नसावं. शेती, नर्सिंग, शिक्षण क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रातही मुलं उजळू शकतात. याकडेही लक्ष द्यायला हवं मुलांचे मानसिक आरोग्य बिघडू नये म्हणून पालकांनी मुलांवर अपेक्षांचं ओझं टाकू नये. कमी मार्क मिळाले तरी योग्य दिशा दिल्यास या मुलांचं यशस्वी करिअर घडू शकतं. लहान वयातच मोबाईलच्या अतिरेकामुळे मूलभूत संस्कार हरवत चालले आहेत. घरात मोठ्यांचे मार्गदर्शन आणि एकत्रित कुटुंबपद्धतीमुळे चांगले संस्कार रुजतात असा आपला अनुभव असल्याचं अलका कुबल यांनी सांगितलं आहे. स्वतःच्या करिअरमध्ये सासू-सासऱ्यांच्या पाठिंब्यामुळे आणि योगदानामुळे आपल्याला यश मिळालं हे त्यांनी खासपणे नमूद केलं आहे. असंही अलका कुबल म्हणाले. अलका कुबल म्हणाल्या की वडिलांनी मुलींवर अत्याचार केल्याच्या बातम्यांवर तीव्र प्रतिक्रिया देत अशा बापावर आखाती देशा प्रमाणे कठोर कारवाई व्हायला पाहिजे एवढंच नव्हे तर मुलींनी अशा बापाचा खून करायला पाहिजे अशी प्रतिक्रिया अलकाकुबल यांनी दिली आहे. तसेच पुढे बोलताना अलका कुबल म्हणाल्या की एकटेपणा सुखद नाही कुटुंब हवंच आई होण्याचा अनुभव जगातला सर्वोत्तम आहे. अलका कुबल यांनी त्यांच्या वर्कफ्रंटबाबतही माहिती दिली. येत्या दि.२४ एप्रिलला वजनदार हे मराठी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय त्या एका हिंदी वेब सीरिजमध्येही दिसणार आहेत. तसेच एक टेलिव्हिजन शो आणि मराठी चित्रपटांसाठीही अलका कुबल काम करत आहेत.