पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात खंडाळा येथे उड्डाणपुलावरून दुचाकी ७० फूट खाली कोसळून झालेल्या अपघातात पती ठार झाला आहे. दुचाकीवरून दांपत्य कोल्हापूरला जात होते. भरधाव मोटारीने हुलकावणी दिल्याने दुचाकी सेवा रस्त्यावर कोसळली. यावेळी दांपत्य सेवा रस्त्यावरून कोसळले  या अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला.

Satara | खंडाळ्यात विचित्र अपघात..! उड्डाणपुलावरून दुचाकीस्वार दाम्पत्य खाली पडले, पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी....(संग्रहित दृश्य.)

खंडाळा उड्डाणपुलावरून पुण्याहून कोल्हापूरला जात असताना.

पुणे सतरा महामार्गावर आज गणेशोत्सवामुळे वाहनांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीतून खंडाळा उड्डाणपुलावरून पुण्याहून कोल्हापूरला जात असताना भरधाव मोटारीने हुलकावणी दिल्याने दुचाकी चालकाने जोरात ब्रेक दाबला. त्यामुळे दुचाकी उड्डाणपुलावर अडकली. दोघेही खाली सेवा रस्त्यावर कोसळले. त्यात पतीचा जागीच मृत्यू झाला. हि घटना दुपारी साडेबारा वाजता घडली आहे.

खूशखबर! पोलिसांची आणखी १२ हजार पदे भरणार, पोलीस क्रीडा अकादमी उभारण्याचा निर्णय - Marathi News | 12 thousand more posts of police will be filled, decision to set up police sports academy |(संग्रहित दृश्य.)

खंडाळा पोलीस तात्काळ अपघात स्थळी उपस्थित.

उपेंद्र नागेश चाटे (वय ४०)असे मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. उन्नती उपेंद्र चाटे या गंभीर जखमी झाले असून त्यांना साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर खंडाळा पोलीस तात्काळ अपघात स्थळी दाखल झाले भर दुपारी गणेशोत्सवात अपघात घडल्याने बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.