TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | KEDGAON | KOTWALI POLICE STATION | DEPUTY SUPERINTENDENT OF CITY DIVISION AMOL BHARTI | KOTWALI POLICE INSPECTOR PRATAP DARADE | SUB-INSPECTOR SEDWAD | A YOUNG MAN WAS STABBED IN THE HEAD WITH CASTE ABUSE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
आमच्या भांडणात पडू नको, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना केडगाव परिसरात शुक्रवार दि. ३० मे रोजी सायंकाळी ७:३० वाजता घडली आहे. अभिषेक बाळासाहेब नवगिरे (वय २३ रा.बुरुडगाव, ता.नगर, हल्ली रा. ऑगस्ट कॉलनी, केडगाव) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. नवगिरे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जहीर ईक्राम सय्यद, लैला जहीर सय्यद व एक अनोळखी इसम यांच्याविरुद्ध अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
कोयत्याने ठार मारण्याच्या उद्देशाने वार…
फिर्यादी नवगिरे हे शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता त्यांचे काम आटोपून घरी जाण्यासाठी मोटरसायकल चालू करत असताना आरोपी जहीर सय्यद व लैला सय्यद तेथे आले. त्यावेळी जहीर सय्यद याच्या हातात कोयता होता. तो नवगिरे यांना म्हणाला, तू आमच्या भांडणात पडू नको, तुला काय करायचे मी कोठेही बल्ल्या ठोकीन, थांब तुला मी आता जिवे मारीन, तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून त्याने हातातील कोयत्याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केला होता. कोयत्याचा वार नवगिरे यांच्या डोक्याला लागल्याने डोक्याला जखम झाली आहे. त्यानंतर लैला सय्यद आणि अनोळखी इसम यांनी फिर्यादी नवगिरे यांच्या पोटात लाथा मारून त्यांचा हात पिरगळला होता.
स्त्रोत सोशल मिडिया
पुढील तपास शहर पोलीस उपाधीक्षक करणार.
जातिवाचक शिवीगाळ करून येथे काम कसा करतो, या धेडाचे हातपाय तोडतो अशी धमकी दिली. तेव्हा फिर्यादी नवगिरे यांनी आरडाओरड केल्याने अकबर सय्यद व सतीश सातपुते हे फिर्यादी नवगिरे यांना वाचविण्यासाठी आले असता, आरोपींनी तेथून पलायन केले असे फिर्यादीत म्हटले आहे. शहर विभागाचे उपअधीक्षक अमोल भारती,कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे उपनिरीक्षक सेदवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा पुढील तपास उपअधीक्षक भारती करत आहेत.