नगरमध्ये डॉक्टर व त्यांच्या पत्नी आणि मुलीला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण….
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | ATHARE PATIL HOSPITAL | AATHRE PATIL HOSPITAL IN SAVEDI IN THE CITY AND RANSACKED THE DOCTOR'S HOUSE AND ABUSED AND BEAT UP HIS WIFE AND DAUGHTER. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
नगर – सावेडी उपनगरात असलेल्या हॉस्पिटलमध्ये घुसून इलेट्रिक साहित्य, बेड व इतर वस्तू बाहेर फेकत ऑपरेशन थिएटर मधील मशिनरींची तोडफोड केली आहे. तसेच हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर असलेल्या डॉक्टरच्या घरात घुसून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना टोळयाने मारहाण केल्याची घटना रविवारी (दि.९) सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
हॉस्पिटलमध्ये तोडफोड…
याबाबत डॉ. अनिल सूर्यभान आठरे (वय ७३, रा. आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्यावर, झोपडी कॅऩ्टीन समोर, सावेडी) यांनी रात्री उशिरा तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. झोपडी कॅऩ्टीन समोर असलेल्या त्यांच्या आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये रविवारी (दि.९) सायंकाळी ६.३० च्या सुमारास आरोपी गणेश सर्जेराव फसले (रा. ओम रेसिडेन्सी, तपोवन रोड), घंट्या उर्फ गणेश घोरपडे व त्यांच्या समवेत काही अनोळखी इसम आले होते. त्यांनी जोरजोरात शिवीगाळ करत हॉस्पिटलमधील बेड, इलेट्रिक साहित्य व इतर वस्तू बाहेर फेकत नुकसान केले आहे. त्यानंतर ऑपरेशन थिएटरमधील मशिनरींची तोडफोड केली आहे. तसेच हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर असलेल्या डॉ. आठरे यांच्या घरात घुसून त्यांना व त्यांच्या पत्नी आणि मुलीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. तसेच ५० लोक घेवून येवू आणि तुम्हाला उध्वस्त करू अशी धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत सांगितले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी या टोळया विरुद्ध भा. दं. वि. कलम ३५४, ४२७, ४४८, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.