भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शामी याच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. दुखापतीमुळे तो विश्वचषकापासून भारतीय संघाबाहेर होता. विश्वचषकादरम्यान दुखापत असतानाही शामी यानं विश्वचषकात भेदक मारा केला होता. पण त्यानंतर त्याची दुखापत जास्तच बळावली. शामीने एनसीएमध्येही उपचार घेतले पण काही फरक पडला नाही. त्यामुळे अखेर त्यांनी सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद शामी याच्या पाया वरील सर्जरी यशस्वी झाली आहे. शामीनं एक्सवर पोस्ट शेअर करत सर्जरी यशस्वी झाल्याची माहिती दिली.
मोहम्मद शामी यानं सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो हॉस्पिटलमधील आहेत. कॅप्शनमध्ये शामीनं म्हटलेय की आताच माझ्या घोट्याचं यशस्वी ऑपरेशन झालं. सर्वकाही सध्या ठीक आहे. मला सावरण्यासाठी वेळ लागेल. लवकरच पायावर उभं राहील. मोहम्मद शामीच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो मागील चार महिन्यापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. शामीला दुखापतीमधून सावरण्यासाठी वेळ लागणार आहे. शामी आयपीएलमध्येही खेळताना दिसणार नाही. तो आयपीएल २०२४ ला मुकणार आहे. शामीच्या दुखापतीचा फटका गुजरात संघालाही बसणार आहे.
गुजरातला धक्का
वनडे विश्वचषकानंतर मोहम्मद शामी दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहे. दुखापत असतानाही मोहम्मद शामी यानं भारतासाठी विश्वचषक गाजवला होता. सध्या सुरु असलेल्या इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेलाही तो मुकला आहे. मोहम्मद शामी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक करण्याची शक्यता आहे.स्टार गोलंदाज मोहम्मद शामी दुखापतीमुळे आयपीएलला मुकणार आहे. हा गुजरातसाठी मोठा धक्का मानला जात आहे. गुजरातनं २०२२ मध्ये आयपीएल पदार्पण केले, त्याचवर्षी त्यांनी जेतेपदावर नाव कोरलं होत. त्यानंतर गेल्यावर्षी गुजरातला उपविजेतेपदावर समाधान मानवं लागलं. या दोन हंगमात मोहम्मद शामी यानं गुजरातकडून भेदक मारा करत विजयात मोलाचा वाटा उचललाय. पण आता दुखापतीमुळे मोहम्मद शामी आयपीएल स्पर्धेला मुकणार आहे.