राज्याला हादरवून सोडणार्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ८० दिवसांमध्ये पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रामधून वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सुत्रधार असल्याचं पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून सिद्ध झालेल आहे. त्यामुळे वाल्मिक कराड भोवती आता कारवाईचा फास पूर्णतः आवळला गेला आहे. यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी म्हणून वाल्मीक कराडचा उल्लेख करण्यात आलेला आहे.