By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: नगर शहर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी ठाकरेंच्या हातून बांधले शिवबंधन ; शिवसेनेत गळती असतांना शिवसेना मजबूत करण्याचा काळेंचा यल्गार ?
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > राजकारण > नगर शहर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी ठाकरेंच्या हातून बांधले शिवबंधन ; शिवसेनेत गळती असतांना शिवसेना मजबूत करण्याचा काळेंचा यल्गार ?
राजकारण

नगर शहर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी ठाकरेंच्या हातून बांधले शिवबंधन ; शिवसेनेत गळती असतांना शिवसेना मजबूत करण्याचा काळेंचा यल्गार ?

Last updated: 2025/02/24 at 7:12 PM
By BHAIYYASAHEB BOXER 4 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR

मुबई : अहिल्यानगर शहर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश केला आहे. रविवारी (दि.२३) दुपारी मातोश्री येथे पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काळे यांच्या हाती शिवबंधन बांधत मशाल दिली आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, किरण काळेंसारखे लढवय्ये नेतृत्व आता शिवसेनेमध्ये आले आहेत. त्यांचा प्रवेश म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध येणे नव्हे तर चुकीच्या दिशेने चाललेला प्रवाह योग्य दिशेला नेण्याचे काम ते करत आहेत असे म्हणत ठाकरे यांनी काळे यांचे शिवसेनेत स्वागत केले आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत किरण काळे समर्थकांनी मातोश्री परिसर दणाणून सोडला. काही दिवसांपूर्वी काळे यांनी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते शिवसेना (ऊबाठा) गटात प्रवेश करतील अशी सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर त्यांनी ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना नेते तथा प्रवक्ते खासदार संजय राऊत, उपनेते साजन पाचपुते, अहिल्यानगर शिवसेना संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रशांत भाले, ज्येष्ठ शिवसैनिक रावजी नांगरे, डॉ. श्रीकांत चेमटे, किरण बोरुडे, दिलदार सिंग बीर, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास शिंदे, सुरज ठोकळ, मनीष गुगळे, ऋतुराज आमले, जेम्स आल्हाट, सुजय लांडे, भाकरे महाराज, उमेश काळे, किरण डफळ, दत्तात्रय गोसंके, मुन्ना भिंगारदिवे, अमित लद्दा आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

Kiran Kale(संग्रहित दृश्य.)

 शहरात शिवसेना मजबूत करणार.

पक्ष प्रवेशानंतर बोलताना किरण काळे म्हणाले की, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, हिंदू धर्मरक्षक स्व. अनिलभैय्या राठोड यांच्या विचारांना अभिप्रेत असणाऱ्या, तसेच शहरातील गोरगरीब, व्यापारी, उद्योजक, नोकरदार, महिला, युवा, ज्येष्ठ नागरिक यासह सर्व घटकांच्या प्रश्नांना सोडवणुकीसाठी मी काम करणार आहे. शहरात शिवसेनेची भक्कम संघटना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बांधणार आहे. शहराचा विकास हा माझ्या कामाच्या केंद्रस्थानी असेल. काही लोक बेगडी हिंदुत्वाची झूल पांघरून सध्या शहरामध्ये वावरत आहेत. त्यांचा बुरखा शिवसैनिक फाडतील. ओरिजिनल हिंदुत्व काय असतं हे आम्ही दाखवून देऊ. जुन्या, नव्या शिवसैनिकांचा मेळ घालून आगामी काळात शहरामध्ये आम्ही निश्चित भगवा फडकवू असा ठाम विश्वास यावेळी काळे यांनी व्यक्त केला. यावेळी विलास उबाळे, आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, गणेश आपरे, शंकर आव्हाड, दत्ता गायकवाड, किशोर कोतकर, विनोद दिवटे, मयूर भिंगारदिवे, आकाश डहाने, राकेश बोरुडे, गणेश भिंगारदिवे, आनंद जवंजाळ, अक्षय साळवे, कुणाल कुजागरे, वैभव दिवटे, लकी काळे, सुदर्शन पवार, दर्शन आल्हाट, अनिकेत गायकवाड, सुरज बोर्डे, आदित्य साळवे, ओंकार काळे, रोहित वाघमारे, श्रीकांत फुलारी, सनी चव्हाण, जयराम आखाडे, बाबासाहेब वैरागळ, दीपक काकडे, देवराम शिंदे, राजेंद्र तरटे, भगवान शेंडे, विठ्ठल अनारसे, बबन ससाने, संतोष वाघमारे, गणपत वाघमारे, अनिल कारले, गोरख कारले, रोहिदास भालेराव, बाळासाहेब अनारसे, गौतम शेंगदाणे, पंडित झेंडे, गोरख माने, विनोद शिरसाठ, लखन कापुरे, ईश्वर पवार, अर्जुन जाधव, राहुल साळवे, मछिंद्र पांढरे, सचिन लोंढे, सुरेश विधाते, वैभव खरात, कुणाल भालेराव, प्रशांत कदम, संदेश काळे, अमोल माळी, अंकुश गवळी, अक्षय शिरसाठ, मनोज उबाळे, पांडुरंग हजारे, दत्तात्रय कळमकर, सचिन वाघमारे, अमर डाके, संतोष गरुडकर, गणेश गवळी आदींसह शहर काँग्रेसच्या शहर जिल्हा कार्यकारणी, विविध फ्रंटल, आघाड्या, सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक यांनी मोठ्या संख्येने यावेळी काळे यांच्यासह शिवसेना उबाठामध्ये प्रवेश केला.  

You Might Also Like

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

तर राजकारणात त्याचे कसे तुकडे करायचे ठरवू , उद्धव ठाकरेंचा मातोश्री वर यल्गार ?

अजित पवार दोषी असेल तर फासावर लटकवा, वैष्णवी हागवणे मृत्यूप्रकरणी अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया ; म्हणाले असले नालायक लोक मला……

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात? प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात

आगामी महापालिका महायुती म्हणून एकत्र लढणार, पण… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितल…

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article सोन्याच्या दागिन्यांसाठी वृद्धेच्या तोंडात बोळा कोंबत गळा दाबून तिचा केला खून ; धक्कादायक माहिती समोर…..
Next Article मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ; आज सर्वाच्च न्यायालयात सुनावणी.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?