Reading:कल्याणीनगर भागात पोर्शे कार अपघातानंतर माजी मंत्री तनपुरेंच्या पत्नीचा मोठा आरोप, म्हणाल्या त्या मुलांच्या त्रासाला कंटाळून मी माझ्या मुलाची शाळा बदलली होती.
कल्याणीनगर भागात पोर्शे कार अपघातानंतर माजी मंत्री तनपुरेंच्या पत्नीचा मोठा आरोप, म्हणाल्या त्या मुलांच्या त्रासाला कंटाळून मी माझ्या मुलाची शाळा बदलली होती.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | PUNE | KALYANI NAGAR ACCIDENT | COMMISSIONER OF POLICE, PUNE | SURENDRA KUMAR AGGARWAL | RENOWNED INDUSTRIALIST VISHAL AGARWAL | EX. MINISTER PRAJAKT TANPURE | SONALI TANPURE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्शे कार बेकायदेशीरपणे चालवून झालेल्या अपघाताने महाराष्ट्र हादरला आहे. प्रसिद्ध उद्योजग विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोघांना भरधाव वेगाने पोर्शे कारने धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला व हे प्रकरण पाहता पाहता देशभर पसरले आणि सगळीकडे याचा निषेध सुरु झाला. या संतापाची दखल घेत पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे. एकीकडे हे प्रकरण गाजत असताना आता सोनाली तनपुरे यांनी धक्कादायक माहिती दिल्याने खळबळ उडाली आहे.
स्त्रोत.सोशल मिडीया.
वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर….
आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी ट्विट करत काही माहिती देत आरोप केले आहे. सोनाली तनपुरे म्हणाल्या की पुणे पोर्शे कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपी व माझा मुलगा एकाच वर्गात शिक्षण घेत होते. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला असल्याचे व त्याची तक्रार देखील मी त्यांच्या पालकांकडे केली होती परंतु तक्रार करूनही योग्य तो प्रतिसाद मला मिळाला नाही व शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून मी माझ्या मुलाची शाळा बदलली होती. त्या घटनेचा वाईट परिणाम आजहि माझ्या मनावर होत आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित आज घडलाच नसता. झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला असून त्यांची कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे या कुटुंबांना न्याय मिळायला हवा असेही तनपुरे यांनी म्हटले आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
संपत्तीच्या वादात त्यांनी छोटा राजनची मदत. ?
या अपघातासंदर्भात पोलिसांना आणखी एक धागादोरा लागला असून अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड छोटा राजनशी संबंध असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. त्यांचे त्यांच्या भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात त्यांनी छोटा राजनची मदत घेतली होती अशी माहिती पोलिसांना समजली असल्याची माहिती मिळाली आहे.