पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याच्या रागातून एका संतप्त महिलेने चक्क पोलीस निरीक्षकांचीच केली आरती.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MAHARASHTRA POLICE | BULDHANA | AS THE BULDHANA POLICE DID NOT TAKE ACTION, A WOMAN PRAYED TO THE POLICE OFFICER | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात मलकापूर शहरातील एका प्रख्यात डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याने एका मुलाचा पाय कायमचा जायबंदी झाल्याचा आरोप एका मुलाच्या आईने केला आहे. परिणामी याबाबत रितसर तक्रार पोलिसांकडे करत या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणीही केली. मात्र एक महिन्याचा अवधी होऊनही पोलिसांनी कुठलीही कारवाई या डॉक्टरच्या विरोधात केली नाही. तसेच गुन्हाही नोंदवला नाही. परिणामी संतप्त महिलेने थेट पोलीस ठाणे गाठत हातात आरतीचे ताट घेऊन चक्क पोलीस निरीक्षकांचीच आरती केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
भांबावलेल्या ठाणेदारांनी पुढील दोन दिवसात यावर ठोस कारवाई करतो….
मलकापूर शहरातील एका प्रख्यात डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याने आपल्या मुलाचा पाय कायमचा जायबंदी झाल्याचा आरोप करत या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी मलकापूर शहरातील एका महिलेने केली होती. मात्र एक महिना होऊनही पोलिसांनी कोणतीही कारवाई या डॉक्टर विरोधात केली नसल्याने आणि गुन्हाही नोंदवला नसल्याने या पीडित महिलेने चक्क पोलीस निरीक्षकांच्या दालनात जाऊन त्यांची आरती केली आहे. मी दिलेल्या तक्रारीची अद्याप दखल न घेता कुठलीही कारवाई केली नसल्याचे जाब विचारत त्यांनी ठाणेदाराची चक्क आरतीच उतरवली. यामुळे भांबावलेल्या ठाणेदारांनी पुढील दोन दिवसात यावर ठोस कारवाई करतो, असे उत्तर देऊन आक्रमक महिलेला शांत केले. मात्र या महिलेने उचललेल्या पावलाची जिल्हाभरात चांगलीच चर्चा होत आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
ट्रॅक्टरच्या चाकामध्ये येऊन किसनाबाई यांचा जागेवरच मृत्यु झाला.
घराच्या अंगणात कपडे धुत असलेल्या महिलेला एका भरधाव ट्रॅक्टरने चिरडल्याची घटना घडलीय. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील किडंगीपार येथे घडली. किसना बुधराम चोरवाडे (५८) असे मृत महिलेचे नाव आहे. मृतक महीला आपल्या घरासमोर कपडे धुत असताना अचानक समोरून संदीप कोरे हा ट्रॅक्टर चालवीत आपल्या शेतातून धान घेऊन येत होता. मद्यधुंद अवस्थेमध्ये असलेल्या संदीपचे त्याच्या ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटलं आणि चक्क किसनाबाई यांच्या घराच्या अंगणात ट्रॅक्टर गेलं. त्यानंतर त्या ट्रॅक्टरच्या चाकामध्ये येऊन किसनाबाई यांचा जागेवरच मृत्यु झाला. या घटनेची नोंद आमगाव पोलिसात करण्यात आली असून आमगाव पोलीस पुढील तपास करीत आहे.