TIMES OF NAGAR
जालना : देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचे उद्घाटन केलं होतं. मात्र अद्याप त्याचा पाया देखील रचला गेला नाही. देशात आणि राज्यात तुम्हाला हिंदूंची मतं, मराठ्यांकडून सत्ता चालते, मात्र या देशाचे आणि राज्याचे दैवत छत्रपती शिवरायांचे स्मारक उभं करायला वेळ लागतो, त्यासाठी तुमचा निषेधच केला पाहिजे. या शिवजयंतीपर्यंत अरबी समुद्रात स्मारक व्हायला पाहिजे होत. मात्र तसं झालं नाही. देवेंद्र फडणवीस मी तुम्हाला साहेब म्हणतो. पण तुम्ही छत्रपतींचे स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करा, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तसेच मुंबईतील शिवाजी पार्कचे नाव सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं करा, अशी मागणी ही जरांगे यांनी केली आहे.



&fmt=webp)