TIMES OF AHMEDNAGAR
राज्यात मराठा समाजाचं मागासलेपण शोधण्यासाठी मागासवर्गीय आयोगामार्फत राज्यात मराठा समाजाचे सर्वेक्षणाचे काम हाती घेतलं आहे. ३१ जानेवारी २०२४ पर्यंत हे सर्वेक्षणाचं काम पूर्ण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी काम महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या भागात सर्वेक्षणाचं काम सुरू केलं आहे. परंतु या सर्वेक्षणाच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अनेक कर्मचारी हे अशिक्षित, अप्रशिक्षित असल्यानं सर्वेक्षणाच्या कामांमध्ये अडथळे येत असल्याची बाब समोर आली आहे.
महानगर पालिकेचा कर्मचारी अशिक्षित ?
अहमदनगर शहरातील भोसले आखाडा या परिसरामध्ये महानगरपालिकेतर्फे विद्युत विभागातील एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे.त्या कर्मचाऱ्याने आपल्याला काहीच येत नसल्याचे कबुल केले आहे. संरक्षणासाठी ज्या घरामध्ये कर्मचारी गेला होता, त्या घरातील व्यक्तीने या सर्वेक्षणाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केला आहे. एका मुलाला सोबत घेऊन आपण हे काम करत आहे, अशी कबुली सर्वेक्षणाला आलेल्या कर्मचाऱ्याने दिली आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
प्रशिक्षण देऊन देखील तो अशिक्षित . ?
महानगर पालिकेने सर्वेक्षण सुरु करण्यापूर्वी नेमणूक केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना ॲपचे प्रशिक्षण दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल भारताची संकल्पना मांडून भारताची वाटचाल हि डिजिटल युगाकडे सुरु असल्याचे भाष्य केले होते. जगभर डिजिटल युग आहे. लहान मुलांना देखील मोबाईल समजतो. मग व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असलेल्या महानगर पालिकेच्या त्या कर्मचाऱ्याला प्रशिक्षण देऊन देखील काम समजत नसेल तर नवलच आहे. सर्वेक्षणामध्ये या कर्मचाऱ्यांना काम करता येत नसेल तर यांनी आज पर्यंत महानगर पालिका येथे एवढी वर्ष सेवा कशी बजावली असा प्रश्न व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर उपस्थित केला जात आहे. महानगर पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना हजेरी लाऊन आराम करण्याची सवय झाली आहे. ग्राउंडवर सर्वेक्षण करून मराठा समाजाला न्याय मिळून देण्यासाठी कष्ट करण्याची काही कर्मचाऱ्यांची इच्छा नसल्याची चर्चा सध्या खासगीत रंगली आहे. आयोगाने दिलेल्या नियमावलीमध्ये कोणत्याही शिक्षणाची अट घातलेली नाही. महानगर पालिकेने नेमलेल्या काही कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल सदर केला असल्याचे समजते.
स्त्रोत.सोशल मिडिया.
काय अडचण येत आहे ?
राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला सुरवात झाली आहे. गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जात आहे. यासाठी संबधित अधिकाऱ्यांना MSBCC SURVEY नावाचे मोबाईल ॲप देण्यात आले आहेत. ज्यात अधिकाऱ्यांना युजर आईडी म्हणून त्यांचा मोबाईल नंबर देण्यात आला आहे. परंतु, दुपारपासून संबंधित ॲपमध्ये लॉगईनच होत नाही. यावेळी Error Http failure response for https://api.gipesurvey.in/enumerator/otp: 502 Bad Gateway असे इरर्र येत आहे. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम बंद पडले आहे. एकीकडे ३१ जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण संपवण्याच्या सूचना मागासवर्ग आयोगाने दिल्या आहेत, मात्र दुसरीकडे मोबाईल ॲप चालत नसल्याने सर्वेक्षण ठप्प पडले आहे. त्यामुळे ठरलेल्या वेळेत हे सर्वेक्षण पूर्ण होणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
मोबाईल ॲपच बंद .
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला राज्यभरात सुरवात झाली आहे. मात्र, गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेला मोबाईल ॲप पहिल्याच दिवशी बंद पडला आहे. दीड तासांपासून सर्वर ठप्प असल्याने सर्वेक्षणाचे काम थांबले होते. त्यामुळे वेळेत हे सर्वेक्षण कसे पूर्ण असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगाच्यावतीने सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली होती. गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सर्वेक्षण करणाऱ्या प्रगनकांच्या मोबाईलवर ॲप देण्यात आले आहे. त्या माध्यमातून सर्वेक्षणाला सुरुवात झाली.
स्त्रोत.सोशल मिडिया.
महापालिकेचे सर्व विभाग बंद
मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या सर्वेक्षणामुळे नगर महापालिकेची सर्व विभागाचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. सर्व विभागात सर्वेक्षणामुळे कामकाज ३१ जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत, अशा लेखी सूचना लावण्यात आल्या आहेत. जन्म, मृत्यू, सशुल्क परवाने सर्व विभागाच बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांचे महत्त्वाचे दाखल काढण्याची प्रक्रिया दोन दिवसांपासून थांबली आहे. तसेच प्रगणक म्हणून नेमलेल्यांनी ऑर्डर रद्द करण्यासाठी भेटू नये, अशा देखील लेखी सूचना महापालिकेच्या विभागात लावलेल्या होत्या.