याप्रकरणी विराज रविकांत पाटील (वय ३५, रा. राॅयल पाल्म, सोरेगाव, सोलापूर) याच्याविरुद्ध बलात्कार तसेच शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३२ वर्षीय अभिनेत्रीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यानंतर त्याने अभिनेत्रीला जाळ्यात ओढले. त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर विराजने अभिनेत्रीशी संपर्क कमी केला तसेच तिने विवाहाबाबत विचारणा सुरू केल्यानंतर त्याने टाळाटाळ सुरू केली. त्यानंतर ती विराजला प्रत्यक्ष भेटले. माझ्याशी संपर्क का तोडला ? अशी विचारणा तरुणीने केली. तेव्हा विराजने तिच्यावर पिस्तूल रोखली. मी विवाह करणार नाही. पोलिसांकडे गेली तर मी कोण आहे हे तुला दाखवितो अशी धमकी त्याने दिली. त्याने तिला धक्काबुक्की केलीअसल्याची माहिती पोलिसांनी दिली.