राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या उमेदवारी अर्जातील माहितीवरून अपक्ष उमेदवार किरण गुलाबराव काळे यांनी आक्षेप घेतला होता. निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी या हरकतीच्या अनुषंगाने आमदार संग्राम जगताप यांना नोटिस काढली होती. त्यावर बुधवारी दुपारी सुनावणी झाली. आक्षेप आणि त्यावरील म्हणणे पुरावे विचारात घेऊन रात्री उशिरा आमदार संग्राम जगताप यांचा अर्ज वैध ठरविला.
(संग्रहित दृश्य.)
जोरदार सुनावणी.
दरम्यान अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघासाठी २७ इच्छुकांनी ३७ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील तिघांचे अर्ज अवैध ठरविले असून २४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविले गेले असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे. आमदार जगताप यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जातील माहितीवरून अपक्ष उमेदवार किरण काळे यांनी बुधवारी छाननी दरम्यान हरकत घेतली होती. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दुपारी सुनावणी ठेवली होती. यावर दोन्ही बाजूचे म्हणणे मांडण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकून घेत आमदार संग्राम जगताप यांचा अर्ज वैध ठरविला आहे.