TIMES OF AHMEDNAGAR
शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकाल जाहीर होण्यास आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष आहे. या निकालाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यात भेट देखील झाली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल बुधवारी दुपारी चार वाजता देणार आहे. नार्वेकरांनी निकालाचे काम जवळपास पूर्ण केले आहे. त्यांच्या या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राहुल नार्वेकर यांनी १४ सप्टेंबर ते २० डिसेंबर दरम्यान मॅरेथॉन सुनावणी घेतली. या सुनावणी दरम्यान दोन्ही गटाच्या आमदारांच्या बाजूने जोरदार युक्तीवाद झाला होता. त्यानंतर सुमारे ५०० पानांचे निकालपत्र तयार झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शिवसेनेच्या कोणत्या गटाचे आमदार अपात्र ठरणार हे बुधवार १० जानेवारीला स्पष्ट होणार आहे.
निकालाचे मुद्दे.
सर्वोच्च न्यायालयाचा निकालानंतर कोणाचा व्हिप पात्र ठरतो, ते लक्षात घेतले गेले आहे. दोन्ही गटाकडून सादर करण्यात आलेली कागदपत्रे आणि पुरावे तसेच साक्षीदारांची माहिती आणि वकिलांचा युक्तीवाद लक्षात घेऊन निकाल तयार केला आहे.विश्वासदर्शक ठरवावेळी बजावलेला व्हिप आणि मतदानचा मुद्दा लक्षात घेऊन निकाल तयार करण्यात आला आहे.
पुढील शक्यता
विधानसभा अध्यक्षांचा निकाल शिंदे गटाकडे असण्याची शक्यता जास्त वर्तवली जात आहे. परंतु ठाकरे गटाचे आमदार अपात्र झाल्यास ठाकरे गटाला सहानुभूती मिळण्याची शक्यता जास्त आहे. त्याचा फायदा ठाकरे गटाला आगामी निवडणुकीत होणार आहे.तर शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरण्याची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार अपात्र ठरु शकतात. त्यामुळे सरकार अस्थिर होऊ शकते. कोणत्याही गटाचे आमदार अपात्र होणार नाही. त्यामुळे ठाकरे गटाच्या सहानभूतीची शक्यता नाहीशी होईल. परंतु कोर्टाच्या निर्णयानुसार दोन्ही पैकी एका गटाला अपात्र ठरवावेच लागणार असल्याचे मत तत्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पुन्हा सर्वोच्च न्यायालयात …..
उद्धव ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरु केली आहे. कारण अध्यक्षांच्या निर्णयावर पुनर्विलोकन करता येते. यापूर्वी सर्वोच्च न्यायलयाने तसे दाखले दिले आहे. पक्षात फुट नाही आम्ही केवळ नेतृत्व बदल केला, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.