खासदार सुजय विखे आणि माजी आमदार निलेश लंके या दोन्ही उमेदवारांनी आपल्या कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क.
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | LOK SABHA ELECTION 2024 | REVENUE MINISTER RADHAKRISHNA VIKHE PATIL | MP SUJAY VIKHE | MLA NILESH LANKA | MP SUJAY VIKHE AND MLA NILESH LANKA EXERCISED THEIR RIGHT TO VOTE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील , खासदार सुजय विखे यांनी आपल्या कुटुंबासोबत लोणी येथे मतदानाचा हक्क बजवला आहे. राधाकृष्ण विखे यांनी मतदान केल्यानंतर विजयाचा विश्वास व्यक़्त केला आहे. लोणी गावातील विद्यालयात त्यांनी मतदान केले आहे. जनता सुद्द्ण आहे. सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित नेत्याला निवडून देईल असा सुजय विखे यांनी ठाम मत स्पष्ट केले आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
माजी आमदार निलेश लंके हि निवडणूक जिंकून येणार का ?
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी हांगे या गावात आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला आहे. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असून ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतली आहे. त्यामुळे आपल्या विजयावर शिक्कामोर्तब झाले, असा विश्वास नीलेश लंके यांनी व्यक्त केला आहे.या निवडणुकीत अमाप पैसा आणि प्रशासनाचा दुरूपयोग करण्यात आला असल्याचा आरोप नीलेश लंके यांनी केला आहे. सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने मी हि निवडणूक जिंकूनच येणार असे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे.