“मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले” नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले….संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | CHIEF MINISTER EKNATH SHINDE | MP SANJAY RAUT SANJAY RAUT'S ALLEGATIONS AGAINST CHIEF MINISTER EKNATH SHINDE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये आले
खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये महायुतीकडून पैसेवाटप होत असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण ! असं कॅप्शन देत संजय राऊत यांनी एक्स सोशल मीडिया अकाऊण्टवरुन एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये आले. त्यावेळचे दृश्य पाहायला मिळत आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
नुसता पैशांचा पाऊस…
मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण ! नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले.. नुसता पैशांचा पाऊस… दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहात आहेत ? यातून कोणता माल नाशिकला पोहोचवला जात आहे ? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे. असे संजय राऊत यांनी व्हिडिओ ट्वीट करताना लिहिले आहे.