एमपीएससी (MPSC) कडून समाजकल्याणच्या परीक्षेची तारीख जाहीर,आता या तारखेला होणार परीक्षा.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MPSC | MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION | JOB OPPORTUNITY NOW IN SOCIAL WELFARE DEPARTMENT | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) समाज कल्याण अधिकारी गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट-ब या पदांच्या परीक्षांना सुधारित आरक्षण निश्चितीसाठी तीन महिन्यांआधी स्थगिती देण्यात आली होती. परीक्षा लांबल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली होती.त्यानुसार आता १८ ऑगस्टला परीक्षा होणार आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) मे २०२३ मध्ये समाज कल्याण विभागातील विविध पदांसाठी जाहिरात दिली होती.
(संग्रहित दृश्य.)
आता १८ ऑगस्टला परीक्षा होणार.
आयोगाने अभ्यासक्रम आणि परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार १९ मे रोजी समाज कल्याण अधिकारी गट ‘ब’ या पदासाठी परीक्षा होणार होती. मात्र, आयोगाने सुधारित आरक्षणनिश्चिती प्राप्त झाल्यानंतरच परीक्षांबाबत घोषणा केली जाईल, असे सांगत ही परीक्षा स्थगित केली होती. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षाही स्थगित करण्यात आली होती. मात्र मराठा आरक्षणानुसार नवीन आरक्षण निश्चिती करून आयोगाने नागरी सेवा परीक्षेची सुधारित तारीख जाहीर केली. परंतु समाज कल्याण विभागातील विविध पदे आणि अन्य विभागांच्या परीक्षांची तारीख अद्याप जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. आता १८ ऑगस्टला परीक्षा होणार असून आधी खुल्या वर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना आता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या आरक्षणानुसार अर्ज करता येणार आहे. तसेच ज्या उमेदवारांनी कुणबी नोंदणीच्या आधारे इतर मागासवर्गाचे प्रमाणपत्र तयार केले आहेत. त्यांना ओबीसीमधून अर्ज करता येणार असल्याचे आयोगाने जाहीर केले.
(संग्रहित दृश्य.)
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील १८ अशा विविध पदांसाठी जाहिरात.
यासाठी १२ ते २६ जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज करावे लागणार आहे. एमपीएससीने मे २०२३ मध्ये समाज कल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित गट अ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ४१, समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग २२, गृह प्रमुख, गट ब, समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील १८ अशा विविध पदांसाठी जाहिरात दिली होती. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केले आहेत.