TIMES OF AHMEDNAGAR
पीर मुसा कादरी दर्गा परिसरात एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. चाळीसगाव शहरात हि घटना घडली आहे.मयत तरुण हा मुंबई पोलीस दलातील कर्मचारी असल्याचे माहिती समोर आली आहे. दरम्यान, चाळीसगाव पोलिसांनी याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. क्रिकेट स्पर्धेच्या वादातून खून झाल्याची माहिती समोर आली आहे.


