पुणे पोर्श अपघात प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा समोर, आमदार सुनील टिंगरे यांचा अगरवाल कुटुंबाशी थेट संबध….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | PUNE CAR ACCIDENT | MLA SUNIL TINGRE | YERWADA POLICE STATION | COMMISSIONER OF POLICE AMITESH KUMAR | DR. AJAY TAWARE OF SASSOON | AGARWAL MADE 45 PHONE CALLS TO SUNIL TINGRE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
पुणे पोर्श अपघात प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल यांनी आमदार सुनील टिंगरे यांना तब्बल ४५ वेळा फोन केल्याचे तपासातून उघड झाले आहे. १९ मे रोजी पहाटे २.३० च्या सुमारास अगरवाल आणि टिंगरे यांच्यात एकूण ४५ मिस्डकॉल्स होते.
स्त्रोत सोशल मिडिया
पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीकवरून दिली माहिती.
अपघात घडल्यानंतर विशाल अगरवाल यांनी आमदार सुनील टिंगरे यांना फोन केला होता. आमदार टिंगरे झोपेत असल्याने त्यांनी सुरुवातीला फोन उचलला नाही. पहाटे ३.४५ पर्यंत विशाल अगरवाल यांनी टिंगरे यांना तब्बल ४५ वेळा फोन केला. परंतु ४६ व्या कॉलला त्यांनी उत्तर दिले. त्यानंतर ते लागलीच सकाळी ६ वाजता येरवडा पोलीस ठाण्यात अगरवाल यांच्या मदतीसाठी पोहोचले. पोलीस ठाण्याच्या आवारातून जप्त करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही आमदार टिंगरे स्पष्टपणे दिसत आहेत. अगरवाल कुटुंब, पोलिस अधिकारी आणि आमदार टिंगरे यांच्यातील संवादाची नोंद झाली आहे. अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीकवरून दिली आहे. ही घटना त्यांच्याच मतदारसंघात घडली असल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात हजेरी लावली होती. असे सुनील टिंगरे यांनीही स्पष्ट केले होते.
स्त्रोत सोशल मिडिया
सुनील टिंगरे यांच्याविरोधातील जनतेचा रोष….
अपघाताच्या दुसऱ्या दिवसापासून टिंगरे यांचे नाव या अपघातात घेतले जात होते. परंतु आपण अगरवाल कुटुंबाला वाचवण्याकरता नाही तर या अपघात प्रकरणी न्याय मिळण्याकरता प्रयत्न करत असल्याचा खुलासा टिंगरे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. मात्र आता टिंगरे ,अगरवाल कुटुंब आणि ससूनचे सामान्य रुग्णालयाचे डॉ.अजय तावरे यांच्यातील संबंध समोर आले आहेत. आमदार सुनील टिंगरे यांच्याविरोधातील रोष आता वाढू लागला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. टिंगरे यांच्या उपस्थितीत मृताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गैरवर्तनाचा आरोप केला आहे. तसेच मृत अनीश अवधियाचे काका ग्यांद्र सोनी यांनी रुग्णवाहिका व्यवस्था आणि इतर कायदेशीर औपचारिकता दरम्यान मदत न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आमदार सुनील टिंगरे, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, ससूनचे डॉ.अजय तावरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांच्या तपासात पोलीस आणि ससून जनरल हॉस्पिटलमध्ये दोन आलिशान गाड्या असून त्यांच्याशी संबंधित तीन व्यक्ती असल्याचे समोर आले आहे. १९ मे रोजी अल्पवयीन मुलाला पकडले तेव्हा हे लोक पोलीस ठाण्यात हजर होते आणि रक्ताचे नमुने घेईपर्यंत ते थांबले होते. त्यांची ओळख आणि घटनेतील भूमिका निश्चित करण्यासाठी तपास सुरू आहे.