“निलेश भाऊंनी माफी मागितली तसेच मी सुद्धा माफी मागतो”,खासदार लंकेंच्या भेटीवर रोहित पवारांची माफी….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | MP NILESH LANKA ROHIT PAWAR | AMOL MITKARI | KILLING GANGSTERS IN PUNE | ROHIT PAWAR APOLOGIZES FOR NILESH LANKA'S MEETING WITH A GANGSTER IN PUNE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
खासदार निलेश लंके यांनी पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे यांच्या घरी जाऊन सत्कार स्वीकारला होता. त्यामुळे निलेश लंकेंवर चौफेर टीका सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीत गजा मारणेने मदत केली आहे, त्याचे आभार मानायला ही भेट होती का ? अशी टीका अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
लंकेंच्या भेटीबद्दल काय म्हणाले रोहित पवार ?
या सर्व घटनेनंतर रोहित पवार म्हणाले कि, आहिल्यानगरचा आमदार म्हणून आणि निलेश भाऊंच्या प्रचारात सक्रिय असलेला कार्यकर्ता म्हणून सांगतो की, जी गोष्ट घडली ती योग्य घडली नाही. निलेश भाऊंनी देखील माफी मागितली आहे. त्यांना त्याच्याबाबत माहिती नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांना विनंती आहे की, कुठल्याही नेत्याला कोणाच्याही घरी जात असताना थोडासा विचार करावा. कारण त्यांना लोक फॉलो करत असतात. जसे निलेश भाऊंनी माफी तसेच मी सुद्धा माफी मागतो. आमच्यातील एक खासदार नकळत चुकीच्या प्रवृत्तीच्या घरी गेला होता. कृपा करुन याच्यावर कोणही राजकारण करु नये, अशी विनंती आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
लंकेंचे स्पष्टीकरण…..
दरम्यान खासदार निलेश लंके यांनी या सर्व घटनेनंतर स्पष्टीकरण दिले आहे कि, अपघाताने हा प्रकार घडलेला आहे. अशा प्रकारांशी अथवा संबंधित व्यक्तीशी माझा कोणताही हितसबंध नसल्याचे लंके यांनी स्पष्ट केले आहे.अपघाताने ही भेट झाली तरी ती चुकच होती अशी कबुलीही लंके यांनी दिली आहे.