“गाय दूध द्यायचे बंद करते, तेव्हा तिला कसाइकडे पाठवायची तयारी सुरु होते”,अजित पवारांबद्दल अनिल देशमुखांचे गंभीर वक्तव्य….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | POLITICS | NAGPUR | FORMER HOME MINISTER ANIL DESHMUKH | DEPUTY CHIEF MINISTER AJIT PAWAR | SUNETRA PAWAR | MINISTER CHHAGAN BHUJBAL | ANIL DESHMUKH HAS COMMENTED ON AJIT PAWAR AND BJP'S UPCOMING POLITICAL MOVE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
नागपूर- दुभती काय जोपर्यंत दूध देत असते, तोपर्यंत तिला चारा खाऊ घालायचा. पण जेव्हा ही गाय दूध द्यायचे बंद करेल, तेव्हा तिला कसाइकडे पाठवायची तयारी सुरु होते, हे भाजप पक्षाचे धोरण आहे. अजित पवार यांच्याबाबतही काहीसे असेच असावे, असे गंभीर वक्तव्य शरद पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. ते शनिवारी नागपूर मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी अनिल देशमुख यांनी अजित पवार आणि भाजपच्या आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात भाष्य केले आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
अनिल देशमुखांची अजित पवारांबद्दल टीका….
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नुकताच शिखर बँक आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा उकरून काढण्याचे संकेत दिले आहेत. याप्रकरणात अजित पवार यांना क्लीन चीट देण्यात आली होती. मात्र, अण्णा हजारे यांच्याकडून आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टला आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना अनिल देशमुख यांनी म्हटले की, मला तर असे वाटतेय की, हे सगळे षडयंत्र भाजपतर्फे सुरु असावे. विरोधातील नेत्याला आपल्याकडे घ्यायचे, त्यानंतर त्याच्यापाठी पुन्हा चौकशीचा ससेमिरी लावायचा, त्याला बदनाम करायचे. एके एका नेत्याला राजकारणातून कायमचा उठवण्याचा हा भाजपचा प्रयत्न दिसतोय. ‘दूध देनेवाली गाय जब तक दूध देती है, तब तक चारा खिलाते है,गाय दूध देना बंद कर देती है, तो उसको कसाई के पास भेजने की तयारी शुरु होती है”, हे भाजपचे धोरण आहे. अजित पवार यांच्याबाबतही तसेच होत असावे, असा माझा अंदाज असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगतिले आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
छगन भुजबळ यांच्या उमेदवारीबद्दल अनिल देशमुखांचे भाष्य….
यावेळी अनिल देशमुख यांना सुनेत्रा पवार यांच्या मंत्रिपदाबाबत प्रक्रिया विचारण्यात आली होती. त्यावर देशमुख यांनी बोलणे टाळले आहे. हा अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याबाबत अजित पवार किंवा प्रफुल पटेलच बोलू शकतील, असे देशमुख यांनी म्हटले आहे. यावेळी अनिल देशमुख यांनी यांच्या लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीत हुकलेल्या संधीबाबत भाष्य केले आहे. मला आश्चर्य वाटते की दिल्लीतून ग्रीन सिग्नल आल्यावर छगन भुजबळ यांचे लोकसभेचे तिकीट कापले. आता राज्यसभेवरही त्यांना संधी दिली नाही, असे देशमुख यांनी म्हटले आहे.