TIMES OF AHMEDNAGAR
भाग – ६
अहमदनगर जिल्ह्यात गुंडांची दहशत कायम आहेच त्यात शंका व्यक्त करण्याचे एकही कारण नाही. मात्र पोलिसांच्या भूमिकेवर देखील वारंवार संशय घेतला जात आहे. गुन्हे घडतात पोलीस गुन्हेगारांना अटक करतात. मात्र गुन्हेगारांचा व त्या गुन्ह्यांचा पूर्णपणे तपास होत नाही. असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी पत्रकार परिषदेत केला होता. गुन्हेगारांना कोणतीही जात किंवा धर्म नसतो हे जरी खरे असले तरी त्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळनाऱ्या पोलिसांना धर्म असतो.
तो धर्म म्हणजे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत.
कारभार बेकायदेशीर ?
अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय ,अहमदनगर या प्रशासकीय इमारतीमध्ये स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आहे. त्याच इमारतीमध्ये सायबर पोलीस स्टेशनची शाखा आहे.पो.कॉ. प्रशांत राठोड व पो.कॉ.रवींद्र कर्डिले यांना गुन्ह्याच्या तपास करणेकामी सायबर पो.स्टे येथे ३ महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात ०९ मे २०२३ रोजी सलग्न नेमणूक देण्यात आली होती.तसे पत्र पोलीस उपाधीक्षक ,(मुख्यालय) कमलाकर जाधव यांच्या सहीने संबंधितांना पोहोच करण्यात आले होते. नमूद पत्रात नमूद पोलीस अंमलदार यांना कार्यमुक्त केले दिनांकापासून तीन महिने कालावधी पूर्ण झालेनंतर प्रभारी अधिकारी सायबर पो.स्टे यांनी कालावधी पूर्ण झालेनंतर तात्काळ पूर्वीचे ठिकाणी कार्यमुक्त करण्यात यावे तसे या कार्यालयास अवगत करावे असे नमूद करण्यात आले आहे. मात्र अद्यापही या कर्मचाऱ्यांना संबंधित विभागातून कार्यमुक्त करण्यात आले नाही. पोलीस अधिकारांचा बेकायदेशीर वापर करत आहेत स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असतांना रवींद्र कर्डिले यांनी माझ्याकडे लाचेची मागणी केली होती. त्यांच्यावर भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंदविण्यात आला होता. ज्या शाखेत कार्यरत असतांना रवींद्र कर्डिले यांच्यावर लाच मागितल्याचा गुन्हा दाखल आहे त्याच शाखेत कर्डिले हे कार्यरत असल्याचे तक्रारदार असद शेख यांनी म्हंटले आहे.