सोशल मीडियावर घरगुती भांडणाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सासू, सून, नवरा-बायको यांच्यातील छोट्या-मोठ्या भांडणाच्या अनेक घटना सोशल मीडियावर दिसतात. नवरा आणि बायको म्हटलं तर वाद हे होणारच. मात्र घरगुती हिंसाचार म्हटलं की, पुरुषांनी महिलांवर केलेला हिंसाचारच डोळ्यासमोर येतो. पण, वस्तुस्थिती अशी आहे की,पुरुषही महिलांकडून घरगुती हिंसाचार सहन करत असतात. एका जोडप्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण एकच प्रश्न विचारत आहे ते म्हणजे, मर्द को दर्द नही होता ?

मारले बायकोला टोमणे, सुनावल्या चार गोष्टी तर लगेच त्याला मानसिक छळ म्हणायचे  का? - Marathi News | Taunting wife, comparing her with others is mental  cruelty: Kerala HC says.. | Latest sakhiस्त्रोत.सोशल मिडिया.

तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र……

अत्यंत धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. एक महिला आपल्या पतीला अमानुष मारहाण करत आहे. तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र ती काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. ती एका मागोमाग त्याच्या कानाखाली मारत आहे. कधी त्याचे केस ओढत आहे तर कधी डोक्यात मारत आहे. महिलेने पतीचा हात पकडलेला दिसत आहे वारंवार ती पतीला निर्दयीपणे मारत आहे. आजूबाजूला काही लोक हे पाहत आहेत पण मध्यस्ती करण्यासाठी कुणीही पुढे येताना दिसत नाही. दरम्यान यावेळी तिथे उपस्थित असलेल्यापैकी कोणीतरही या घटनेचा व्हिडीओ काढला आहे. अंगावर काटा आणणारी ही अत्यंत निर्दयी मारहाण सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हाही दाखल झाला आहे. 

Dighi: 'रात्री फोनवर कुणाबरोबर बोलतेस' असे विचारणाऱ्या पोलीस नवऱ्याला  बायकोने उलथण्याने मारले Police Constable was beaten by wife and youth  children MPCNEWSस्त्रोत.सोशल मिडिया.

नवरा-बाकोमधील नात्याला तडा गेल्याचा आहे.

सोशल मीडियावर @gharkekalesh या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून व्हिडीओला १४२.७ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच या व्हिडीओवर नेटकरीही संताप व्यक्त करत महिलेवर जोरदार टीका करत आहेत. एका युजरने प्रतिक्रिया देत अन्याय फक्त स्त्रीयांवरच होत नाही अस म्हंटलं आहे. तर आणखी एकानं या महिलेला अटक करण्याची विनंती केली आहे. सोशल मीडियाचे जग हे वेगवेगळ्या आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेलं आहे. इथे कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. कधी मनोरंजक व्हिडीओ तर कधी भांडणाचे, तर कधी आर्ट क्राफ्ट असे व्हिडीओ इथे समोर येत असतात. लोक आपल्या आवडी प्रमाणे व्हिडीओ पाहातात. पण सध्या एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटेल. हा व्हिडीओ नवरा-बाकोमधील नात्याला तडा गेल्याचा आहे.