शहरातल्या बेरोजगार तरुणांना युवराजांचे पाच वर्षानंतर पुन्हा आश्वासन, युवराज मतदारांना खोटी आश्वासने देत आहेत का ?
TIMES OF AHMEDNAGAR | INDIA | MAHARASHTRA | SOUTH LOK SABHA CONSTITUENCY NEWS | SUJAY VIKHE NEWS | NILESH LANEK NEWS | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर शहरासह दक्षिण लोकसभा मतदारसंघात पाच वर्षांच्या कालखंडामध्ये मी जी कामं केली आहे, त्या कामांचं प्रगती पुस्तक तुमच्यासमोर आहे. यापुढे तुम्ही ठरवायचंय, की या मतदारसंघाचा विकास कसा करायचा ? या पुढील काळात तरुणांना नोकरीसाठी नगर सोडून जावं लागणार नाही. तरुणांसाठी तीन कंपन्यांची निर्मिती केली जाणार असून लवकरच ते काम पूर्णत्वास येणार आहे अशी ग्वाही दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुजय विखे यांनी दिली आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
निवडणुकींच्या तोंडावर विखेंची फुसकी आश्वासने ?
अहमदनगर जिल्ह्यासह शहराचा विकास खुंटला असल्याचे भाष्य अनेकदा बड्या नेत्यांकडून केले जाते. दुर्दैवाने हे भाष्य करणारे नेते अहमदनगर जिल्ह्याचेच असतात. मग या नेत्यांना विकास करण्यापासून कोण रोखत आहे हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. अनेक वर्षांपासून शहरातल्या तरुणांना नोकरीसाठी बाहेर जावे लागत आहे. खासदार विखे हे मागील पाच वर्ष खासदार होते मात्र विखेंनी त्यावेळी तरुणांच्या नोकरीचा कधीही विचार केला नाही. आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मात्र विखेंना तरुणांच्या रोजगाराची आठवण झाली आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
पराभूत उमेदवार विखेंच्या मदतीला !
विखे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्यासमवेत राहुरी तालुक्यातल्या ताराबाद, म्हैसगाव, कोळेवाडी, शेरी चिकलठाण, दरडगाव थडी या गावांत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. विशेष म्हणजे राहुरी मतदार संघात शिवाजी कर्डिले यांचा दारूण पराभव झाला होता. कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांनी या पराभवाचे खापर एकेकाळी सुजय विखे यांच्या माथी फोडले होते. कर्डिले यांच्या पराभवाला विखे जबाबदार आहे असे जर त्यांचे कार्यकर्ते मानत असतील तर मग कर्डिले पुन्हा विखेंच्या मदतीला धावून कार्यकर्ते नाराज करत आहेत का असा सवाल विरोधकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
कर्डिले पक्षाला प्रामाणिक की विखेंची भीती ?
महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शनकरून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पाच वर्ष मिस्टर इंडिया असलेले विखे आता दक्षिण मतदार संघात फिरत आहे. काल रोजी राहुरी मतदार संघात माजी.आमदार शिवाजी कर्डिले यांना घेऊन विखेंनी लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी बोलताना कर्डिले म्हणाले विकास कामाच्या माध्यमातून विखे यांनी जनतेच्या मनात एक चांगली प्रतिमा निर्माण केली आहे. जिल्ह्याच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. तृणाच्या रोजगारासाठी नगर तालुका आणि श्रीगोंदा तालुक्यात औद्योगिक वसाहतीसाठी जागा उपलब्ध देण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे.