अहिल्यानगर : शहरात पोलिसांच्या अनेक समस्या आहेत. त्या समस्यांना वरिष्ठांकडून कोणत्याही प्रकारे हाताळले जात नसल्याचे अनेक पोलीस कर्मचारी खासगीत सांगतात. पोलिसांची एक मोठी समस्या ती निवाऱ्याची आहे. राहायला चांगले घर मिळावे यासाठी पोलीस दादांची चांगलीच वणवण होते. पोलिसांना राहण्यासाठी छत असणे गरजेचे आहे. हि बाब आमदार संग्राम जगताप यांच्या निदर्शनास येताच आमदार जगताप यांनी पोलिसांना हक्काचे घर देण्याचे मिशन हाती घेतले. सर्जेपुरा येथील पोलिस वसाहतीमध्ये पोलिसांना आता ३२० फ्लॅट मिळणार असून यासाठी ११५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे.
(संग्रहित दृश्य.)
पोलिसांना हक्काचे घर.
पोलिस अधिकारी-कर्मचार्यांच्या शासकीय वसाहतीची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे याठिकाणी नवीन इमारत व निवासस्थानाच्या बांधकामासाठी मंजुरी मिळावी यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी वेशेष प्रयत्न केले.आमदार जगताप यांनी २०२३ साली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच विधानभवनात तारांकित प्रश्नही उपस्थित करत राज्य सरकारचे या विषयाकडे लक्ष वेधले होते. आता आमदार संग्राम जगताप यांच्या या पाठपुराव्यास यश आले. राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने नुकतीच अहिल्यानगर मधील सर्जेपुरा येथे असलेल्या पोलीस वसाहतीच्या जागेवर नवे ३२० फ्लॅट बांधण्यासाठी ११५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाच्या मंजुरीची वर्क ऑर्डर महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने काढली आहे. जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचार्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. आता त्यांना लवकरच नवीन घरे मिळतील, अशी माहिती आविष्कार ग्रुपचे मनोजकुमार जाधव यांनी दिली. अहिल्यानगर शहरातील सर्जेपुरा येथे असलेल्या पोलिस मुख्यालय येथील जागेवर सध्या असलेली घरे पाडून तेथे नवे बहुमजली अपार्टमेंट उभारून ५०० स्क्वेअर फुटाचे, ३२० टूबीएचके फ्लॅट बांधण्यात येणार आहेत. तसेच पाण्याची टाकी, अंतर्गत पथदिवे व अॅडमिनिस्ट्रेशन ऑफिसही उभारण्यात येणार आहे.
(संग्रहित दृश्य.)
रस्त्यांसाठी कोट्यावधी ….
आमदार संग्राम जगताप यांनी शहरात रस्त्यांच्या कामासाठी देखील मोठा निधी उपलब्ध करून दिला होता. जवळपास ६०० कोटींच्या या निधीमध्ये आमदार जगताप यांनी शहरातील सर्वच रस्त्यांचे काम सुरु केले होते. शहरातील जवळपास पन्नास टक्के रस्त्यांची कामे सध्या पुर्नात्वावर आहेत. आमदार जगताप हे शहराच्या विकासासाठी एकमेव पर्याय असल्याचे अनेकांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र केसरीसाठी शहराला यजमान पद मिळवून देण्यासाठी आमदार जगताप यांचे मोलाचे योगदान आहे.आमदार संग्राम जगताप यांनी शहराच्या विकासासह आता आपला मोर्चा पोलिसांच्या विकासावर वळवत पोलिसांचा घर मिळवून देत पोलिसांच्या मनात घर तयार केले आहे.