पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका महिलेला आपलाजीव गमावावा लागला. पैशांअभावी हॉस्पिटलने गेटवरूनच गर्भवतीला परत पाठवल्याने आणि ऐन वेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने महिलेचा नाहक बळी गेल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे. वेळीच उपचार मिळाले असते तर जन्मताच दोन नवजात बाळांनी आपली आई गमावली नसती अशा शब्दांत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या धक्कादायक घटनेनंतर मृत तनिषा भिसेच्या नंदेने पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. आम्ही सकाळी नऊ वाजता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेलो तिथे त्यांनी बीपी मृत तनिषा भिसे यांचा बीपी चेक केला. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं बीपी हायर साईडला आहे. १०० ते १५० बीपी आहे. त्यानंतर त्यांनी नवील इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर नेण्यास सांगितलं. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं काही खाऊ नका आम्ही डॉक्टरांना सांगितलं आहे. त्यांची थोडी क्रिटीकल परिस्थिती आहे. आपल्याला सिझर करायला लागू शकतं. त्यामुळे काही खावू नका आणि पाणी पिऊ नका. हॉस्पीटलचा ड्रेस चेंज करायला दिला. त्यानंतर डॉक्टर घैसास आले त्यांना आम्ही तिघे मी वहिनी आणि भाऊ भेटलो. त्यांनी चेक केलं. वहिनी फक्त त्या खुर्चीवर बसणार होत्या इतक्यात त्यांनी येऊन सांगितलं. क्रिटिकल सिच्युएशन आहे ब्लिडिंग होतंय पोटात दुखतंय बीपीही हायर साईडला आहे. इमर्जन्सी सिझर करावं लागेल, प्रीमॅच्युअर डिलीव्हरी करायला लागेल, बाळांना सातव्या महिन्यामुळे एनआयसीयु मध्ये ठेवावं लागेल. एनआयसीयु चा खर्च प्रत्येक बाळाचा दहा-दहा लाख रुपये आहे. तुम्हाला आता २० लाख रुपये भरावे लागतील. आम्ही विनंती केल्यावर ते १० लाखांवर मान्य झाले आणि म्हणाले की तुम्हाला जमत नसेल तर जवळच ससून रूग्णाल आहे. तुम्ही तिथे जाऊ शकता तिथे उपचार चांगले होतात. असं तनिषा भिसे यांच्या नणंदाने सांगितले . डॉक्टरांनी हे सगळं माझ्या वहिनीसमोर आम्हाला सांगितलं. तिची मानसिक अवस्था ठीक नाही पोटात दुखतं होतं ब्लिडिंग होतंय हे समजत असूनही त्यांनी तिच्यासमोर सगळं सांगितलं असं नाही त्या पेशंटला बाहेर पाठवा किंवा आम्हाला बोलावून सांगा त्यांनी सगळं वहिनीसमोर सांगितलं आणि निघून गेले. वहिनी रडत रडत लॉबीतून गेली, असेसमेंट रुमला जाऊन बसली. आम्ही त्यांना सांगितलं, की पैशांची व्यवस्था आम्ही करतो तुम्ही उपचार सुरु करा, आयव्ही लावा, ब्लिडिंग थांबवा, पण ते म्हणे तुमच्याकडे जी ब्लिडिंग थांबवायची गोळी असेल ती खा, ते ठिक आहे म्हणाले, पण त्यांनी उपचार सुरुच केले नाहीत. ते म्हणाले आधीच्या रूग्णालयातली ब्लिडिंगवरची गोळी असेल ती घ्या आम्ही गोळी दिली आम्ही म्हणत होतो उपचार सुरू करा, वहिनींच्या मनाला तरी समाधान मिळेल, त्यांनी हेच टेन्शन घेतलं की २० लाख रुपये कुठून आणणार असंही तनिषांच्या नणंदेने बोलताना सांगितलं.