ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये दाखल होणार, सौरव गांगुली यांनी पंतच्या आगमनाची तारीख केली जाहीर.
TIMES OF AHMEDNAGAR | DELHI | DELHI CAPITALS CAMP PRESIDENT SAURAV GANGULI | CRICKETER RISHABH PANT | IPL 2024| RISHABH PANTS COMEBACK TO IPL 2024 | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
वादळी खेळींसाठी प्रसिद्ध असलेला फलंदाज ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानात कधी परतणार आहे याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आता सर्वच क्रिकेटप्रेमींसाठी एक छान बातमी समोर आली आहे. ऋषभ पंत आयपीएल २०२४ मध्ये खेळणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.कारण आता सौरव गांगुली यांनी ऋषभ पंतच्या पुनरागमनाबाबत मोठी अपडेट दिली आहे. दुसरीकडे पंतही त्याच्या पुनरागमनासाठी त्याच्या फिटनेसकडे खूप लक्ष देत आहे.रिहॅबसाठी ऋषभ पंत सध्या बंगळुरूस्थित एनसीए अर्थात नॅशनल क्रिकेट अकादमीत आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया
अकादमी एनसीए लवकरच पंतला फिट घोषित करू शकते.
दिल्ली कॅपिटल्स संघाचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांनी ऋषभ पंतच्या पुनरागमनाबद्दल टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की पंतने स्वत:ला फिट ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. त्यानंतर आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमी एनसीए लवकरच पंतला फिट घोषित करू शकते. आम्हाला आशा आहे की एनसीए ५ मार्चला पंतला क्रिकेट खेळण्यासाठी मंजुरी देईल. त्यानंतर कर्णधारपदाबद्दल चर्चा केली जाईल.आम्हाला पंतबद्दल बेफिकीर राहायचे नाही, आम्ही त्याच्याबाबत खूप सावधानता बाळगून आहोत. कारण त्याच्यासमोर अजून खूप मोठे करिअर आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया
पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन….
भारताचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत दुखापतीतून सावरण्याच्या मार्गावर आहे. डिसेंबर २०२२ मध्ये एका भीषण कार अपघात झाला, या अपघातात तो गंभीररीत्या जखमी झाला होता त्याच्या पायावर शास्राक्रियाहि करण्यात आली होती. त्यामुळे पंत वर्षभरापासून क्रिकेटच्या मैदानाबाहेर आहे. त्यादरम्यान तो आयपीएल २०२३, डब्ल्यूटीसी फायनल, आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक या प्रमुख स्पर्धांना मुकलेला आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमधून पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करेल या प्रतिक्षेत चाहते आहेत.