गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मला एन्काउंटरच्या माध्यमातून मारण्याचा प्रयत्न करत आहेत – मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | CHIEF MINISTER EKNATH SHINDE HOME MINISTER DEVENDRA FADNAVIS MARATHA RESERVATION | MARATHA HUNGER STRIKER MANOJ JARANGE | SHARAD PAWAR | UDDHAV THACKERAY | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मला एन्काउंटरच्या माध्यमातून मारण्याचा प्रयत्न करत आहेत असा दावा करत मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावर आता फडणवीस यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. जरांगेंनी केलेले आरोप हे धादांत खोटे आहेत. आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. मात्र कायद्याचे पालन होत नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई करावीच लागेल, असे फडणवीस मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
स्त्रोत.सोशल मिडिया.
कायद्याचे पालन होत नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई करावीच लागेल.
पत्रकार परिषदेत बोलत असतांना फडणवीसांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. मनोज जरांगे यांना खासदार शरद पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फूस आहे असा अप्रत्यक्ष आरोप फडणवीस यांनी केला. ते म्हणाले की मनोज जरांगे जी स्क्रिप्ट बोलत आहेत तीच स्क्रिप्ट याआधी उद्धव ठाकरे बोलत होते. ज्या स्क्रिप्टवर शरद पवार बोलत होते, नेमके तेच विषय मनोज जरांगे मांडत आहेत. त्यांनी हेच विषय का मांडावेत असा प्रश्न मला पडला आहे. याच कारणामुळ जरांगेंच्या पाठीशी कोण आहे याची काहीशी कल्पना आमच्याकडे आहे. योग्य वेळी ती बाहेर येईल. तुर्तास एवढंच आहे की कायदा, सुव्यवस्था न बिघडवता कोणीही आंदोलन केलं तरी आमची हरकत नाही. मात्र कायद्याचे पालन होत नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई करावीच लागेल.
स्त्रोत.सोशल मिडिया.
सागर बंगला हा सरकारचा आहे.
मनोज जरांगेंनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. ते धादांत खोटं बोलत आहेत. मराठा आरक्षणासाठी मी काय केलं हे मराठा समाजाला माहिती आहे. आजचा सारथी किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मराठा विद्यार्थी, तरुणांसाठी आशेचं स्थान आहे. त्याची सुरुवात मी केलेली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनांत वाढ केलेली आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की सागर बंगला हा सरकारचा आहे. सरकारी काम घेऊन कोणीही या बंगल्यावर येऊ शकतो. मनोज जरांगे हे कोणत्या निराशेतून बोलत आहेत. त्यांना कोणती सहानुभूती घ्यायची आहे याची मला कल्पना नाही.
स्त्रोत.सोशल मिडिया.
ते मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवू शकलेले नाहीत.
मराठा आरक्षण मी उच्च न्यायालयात टिकवलेलं आहे. जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही टिकवलं. माझं मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर ज्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी होती ते मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवू शकलेले नाहीत. त्यामुळे कोणाच्या म्हणण्यावर मराठा समाज विश्वास ठेवेल हे माणणाऱ्यांत मी नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.