बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या बहुप्रतिक्षित ‘सिकंदर’ चित्रपटाचा ट्रेलर (दि.२३) मार्च रोजी एका भव्य कार्यक्रमात प्रदर्शित झाला. या खास प्रसंगी बॉलिवूडमधील अनेक तारे आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होते. ट्रेलर लाँच होण्यापूर्वी, निर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. सिकंदर हा चित्रपट ईदच्या निमित्ताने ३० मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
(संग्रहित दृश्य.)
सलमान खान डॅशिंग लूकमध्ये…..
चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये सलमान खान त्याच्या डॅशिंग लूकमध्ये दिसला. बऱ्याच दिवसांनी, अभिनेता क्लिन-शेव्ह अवतारात दिसला चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला देखील त्यांच्या नवीन लूकमध्ये दिसले आणि त्यांनी त्यांच्या डेनिम ड्रेसमघील लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले. याशिवाय चित्रपटाचे दिग्दर्शक एआर मुरुगादोस यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. सिकंदर चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात अनेक बॉलिवूड स्टार्सनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात अभिनेता शर्मन जोशी आणि अंजिनी धवन, चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारे दाक्षिणात्य अभिनेते सत्यराजही उपस्थित होते. सिकंदर चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे. ट्रेलरमध्ये अॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडी यांचे उत्तम मिश्रण पाहायला मिळाले.
(संग्रहित दृश्य.)
बुकिंग २५ मार्चपासून सुरू होईल.
सलमान खान त्याच्या दमदार शैलीत अॅक्शन करताना दिसतोय. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना आणि काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत आहेत.सिकंदर हा या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. हैदराबाद आणि मुंबईमध्ये याचे मोठ्या प्रमाणात चित्रीकरण झाले आहे. चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला यांनीही घोषणा केली की ‘सिकंदर’ चित्रपटाचे आगाऊ तिकीट बुकिंग २५ मार्चपासून सुरू होईल. चित्रपटाचे संगीत प्रीतम यांनी दिले आहे आणि सत्यराज या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. सलमान खानचा हा बिग बजेट चित्रपट ३० मार्च २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि ट्रेलरनेही उत्सुकता आणखी वाढवली आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणे बाकी आहे.