शरद पवारांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार सत्तेत येणार – डॉ. अनिल आठरे
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | POLITICS | NATIONALIST CONGRESS PARTY (SHARAD PAWAR) | DOCTOR. ANIL ATHRE | HONORING THE NEWLY ELECTED OFFICE BEARERS OF THE NATIONALIST CONGRESS OPPOSITION
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) उपजिल्हाध्यक्षपदी प्रकाश पोटे,युवक शहर जिल्हाध्यक्षपदी रोहन शेलार, शहर जिल्हा संघटक सचिवपदी नितीन खंडागळे, तर अजय पाटोळे यांची अल्पसंख्यांक शहर उपजिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा डॉ. अनिल आठरे यांनी सत्कार केला. यावेळी राजेश भाटिया, निंबोडीचे उपसरपंच बेरड, विनोद साळवे, नाना घोडके आदींसह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
(डॉ.अनिल आठरे. संग्रहित दृश्य.)
पुन्हा जिल्हा राष्ट्रवादीमय होणार….
डॉ. अनिल आठरे म्हणाले की, राज्यात पुन्हा ज्येष्ठ नेते ना. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार सत्तेत येणार आहे. संपूर्ण राज्यात व जिल्ह्यात पक्ष बांधणी जोमाने सुरु असून, पुन्हा जिल्हा राष्ट्रवादीमय होणार आहे. सर्वच क्षेत्रातील व समाजातील व्यक्तींना राष्ट्रवादीच्या माध्यमातून संधी देण्यात येत आहे. नव्या दमाने कार्यकर्ते कामाला लागले असून, येत्या विधानसभेत जिह्याला या पक्षाची खरी ताकद समजणार असल्याची भावना व्यक्त करुन त्यांनी नवोदित पदाधिकाऱ्या राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.