मोदी सरकार विरुद्ध संजय राऊतांचे मोठे वक्तव्य, मुख्यमंत्री आणि अजित पवारांवरहि राऊतांनी डागले टीकास्त्र….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MUMBAI | PRIME MINISTER NARENDRA MODI | CHIEF MINISTER EKNATH SHINDE | DEPUTY CHIEF MINISTER AJIT PAWAR | SHIV SENA LEADER (THACKERAY GROUP) SANJAY RAUT | ANNA HAZARE | SANJAY RAUT CRITICIZES PRIME MINISTER, CHIEF MINISTER AND AJIT PAWAR | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
संघाने ठरवले तर मोदी सरकार १५ मिनिटेही राहणार नाही, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. तसेच, भाजपची मातृसंस्था RSS आहे. आम्हाला RSS बद्दल खूप अपेक्षा आहेत. लोकतंत्र वाचविण्यासाठी RSS चे मोठे योगदान आहे, असेही राऊत म्हणाले आहेत. तसेच अजित पवारांवरही संजय राऊतांनी हल्ला चढवला आहे. गुलाम जास्त आवाज करत नाहीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे अश्रित राजे आहेत असे संजय राऊत म्हणाले आहेत.
स्त्रोत सोशल मिडिया
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर संजय राऊतांचा हल्लाबोल….
ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की आरएसएसबद्दल मी खूप ऐकतोय. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही असेच म्हटले की, लोकसेवकला अहंकार नसला पाहिजे. पण गेल्या दहा वर्षांत आम्ही पाहिलेय की या देशात केवळ अंहकारच आहे. अहंकार आहे, इर्शा आहे, बदल्याची भावना आहे. सत्तेचा गैरवापरही पाहिलाय. अहंकाराच्या राजकारणाला जनतेने रोखले आहे. आम्ही अहंकार थांबवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जिथे जिथे रामाचे वास्तव्य होते, तिथे तिथे भाजपचा पराभव झाला आहे. भाजपची मातृसंस्था RSS आहे. आम्हाला RSS बद्दल खूप अपेक्षा आहेत. लोकतंत्र वाचविण्यासाठी RSS चे मोठे योगदान आहे. गुलाम जास्त आवाज करत नाहीत. गुलाम एखाद्या पार्टीचे आश्रीत असतात. ईस्ट इंडिया कंपनी गुजरातला आहे आणि हे अश्रित राजा आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे अश्रित राजे आहेत, असे म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
राउतांनी केले अण्णा हजारेंचे अभिनंदन….
शिखर बँक घोटाळा प्रकरणाबाबत अण्णा हजारे जागे झाले यांबाबत मी त्यांचे अभिनंदन करतो. राळेगणसिद्धीमध्ये हालचाल सुरू झाली आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली, याबाबत अण्णा हलले, अण्णा बोलले आणि अण्णांनी पत्र लिहिले याबाबत मी त्यांचे अभिनंदन करतो. पण या राज्यात फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही. गेल्या १० वर्षांमध्ये घोटाळेच घोटाळे झाले आहेत. इलेक्ट्रॉल बॉण्डच्या घोटाळ्यावर अण्णांनी आवाज उठवायला पाहिजे. ईडी आणि सीबीआयचा वापर करुन जी खंडणी गोळा केली जातेय, त्यावरही अण्णांनी बोलायला पाहिजे. असे संजय राऊत म्हणाले आहेत. पुढे बोलताना अण्णांना खूप काम आहे. फक्त शिखर बँक घोटाळा बघू नका, राज्यात घोटाळेच घोटाळे झाले आहेत. त्यांनी रामलीला मैदानात बसावे, आम्ही त्यांच्यासोबत असू, असेही संजय राऊत म्हणाले आहेत. प्रभू श्रीरामाने नरेंद्र मोदींचा पराभव केला आहे. नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत रामाची पूजा केली नाही स्वतःची पूजा केली. अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापनेचा सोहळा पाहिला असेल तर सर्व कॅमेरे केवळ मोदींवरच होते, असे म्हणत संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र डागले आहे.